Rajesh Faldessai Dainik Gomantak
गोवा

Rajesh Faldessai on Goa Dairy: दुष्काळात तेरावा...; गोवा डेअरीने 10 कामगारांना दिला नारळ

दूध दरातवाढ करण्याचे दिले संकेत

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोवा राज्यात रोजगाराच्या मुद्यावरुन अनेकवेळा आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. विरोधी पक्षांनी गोवा सरकार राज्यातील युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरल्याचे आरोप कले जात आहेत. यातच आता गोवा डेअरीच्या काही कामगारांना थांबण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी दिली.

(Rajesh Phaldesai has informed 10 workers of Goa Dairy have been laid off)

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोवा डेअरीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत ते म्हणाले की, गोवा डेअरीच्या पशू खाद्य प्रकल्पासाठी प्रशासकीय काळात खरेदी केलेल्या मालाची 10 कोटी रक्कम थकीत आहे. दुध डेअरीच्या वाढत्या कर्ज प्रकरणावरुन धुमशान सुरु असताना आता हा मुद्दा वाढल्याने विरोधक पुन्हा आवाज उठवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढे बोलताना फळदेसाई म्हणाले की, गेल्या काही महिन्यांध्ये दुध डेअरीमध्ये अधिकची कामगार भरती करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा 10 कामगारांना कामावर न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लवकरच दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, दुध डेअरीची संपुर्ण स्थिती लक्षात घेता हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT