Accident In Farmagudi: फार्मगुडी येथे कंटेनरला अपघात! बायपास रोडवरील तीक्ष्ण वळणे म्हणजे मृत्यूचा सापळा

फार्मगुडीमध्ये कंटेनर कलंडला आहे. दरम्यान, ट्रक चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे.
Accident
AccidentDainik Gmantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत. फार्मगुडीमध्ये कंटेनर कलंडला असून, ट्रक चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे. याअपघातानंतर महामार्गाची एक बाजू बंद करण्यात आलेली आहे.

(Container truck Accident in Farmagudi goa)

Accident
Calangute Beach Fire: कळंगुट बीचवर अग्नितांडव; मायकल लोबोंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

दरम्यान काल चोर्ला घाटात एका वळणावर मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक कलंडला असुन या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. या 24 तसात हा दुसरा आपघात आहे.

ढवळी-फार्मगुडी बायपास रोडवरील तीक्ष्ण वळणे म्हणजे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा

ढवळी-फार्मगुडी राष्ट्रीय महामार्ग बायपास रस्त्यावरील तीक्ष्ण वळणे दुरुस्त करण्याची मागणी फोंडा स्थानिकांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. या तीक्ष्ण वळणांमुळे बायपास रोडचा तीन किलोमीटरचा भाग अपघात क्षेत्र बनला आहे.

फोंडा (Ponda) शहरातील गर्दी कमी करण्यासाठी दहावर्षापूर्वी, फोंडा-मडगाव राष्ट्रीय महामार्गावर ढवळी-फार्मगुडी बायपास रस्ता बांधण्यात आला होता, ज्यामुळे फोंडा शहरातील वाहतूक कमी होउन सुरळीत झाली. अपघाताचे प्रमाणही कमी झाले. मात्र, ढवळी-फार्मगुडी बायपास रस्ता बांधताना काही राजकीय लोकांच्या रस्त्यालगतच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता (Ponda Bypass Road) अनेक तीव्र वळणांनी बांधण्यात आला आहे.

Accident
Calangute Beach Fire: कळंगुट बीचवर अग्नितांडव; मायकल लोबोंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

चार वर्षांपूर्वी रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर ढवळी-फार्मगुडी रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. काशीमुट जंक्शनवर तीव्र वळण असलेल्या फार्मगुडी उतारावरील स्पीड ब्रेकरवरून एका क्रेनचे नियंत्रण सुटल्याने तो उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात चालकाला आपला जीव गमवावा लागला होता.

अपघातांचे सत्र सुरुच

गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर कुडचडे येथील सोनू कामत हॉस्पिटलजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून समोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com