Tiger Dainik Gomantak
गोवा

‘देवराई’ हे वाघांचे शेवटचे घर: राजेद्र केरकर

राजेंद्र केरकर: देवराईमुळे जैविक संपदेचे रक्षण

दैनिक गोमन्तक

पणजी: जल, जंगल आणि जमीन आहे, म्हणूनच जीवन आहे. देवराईमुळेच जैविक संपदा, औषधी वनस्पती, पाण्याचे स्रोत टिकून आहेत. देवराई या वाघांसाठी शेवटचे घर आहेत, असे प्रतिपादन पर्यावरणतज्ञ राजेद्र केरकर यांनी केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र गोवाद्वारे इन्स्टीट्यूट मिनेझीस ब्रांगाझा सभागृहात आयोजित केलेल्या गोव्यातील ‘देवराई’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

केरकर म्हणाले, लहानपणापासून मला जंगलांबद्दल आकर्षण होते. आमच्या पूर्वजांनी देवरायांचे संवर्धन संस्कृती व धर्माच्या अनुषंगाने केले. गोव्यात सत्तरी तालुक्यात सर्वांधिक देवराई आहेत. माझ्या केरी गावातच एकूण 11 देवराई आहेत. जर आपल्याला जंगलात उपलब्ध असणारे मसाले पाहायचे असतील तर त्यासाठी माऊलीची राय पाहता येईल. अनेक औषधी वनस्पती देवरायांमध्ये सापडतात. सत्तरीत मानव जन्मापूर्वीच्या वनराया आहेत, माळोली येथील आजोबाची तळी ही त्यापैकीच एक होय. गोव्यातील काणकोण, केपे, सांगे येथील आदिवासी कुडवा परब साजरी करतात.

आजकाल लोक जंगल व देवरायी क्षेत्रात काजू उत्पादन घेऊ लागल्याने अनेक साप तेथे येताना दिसतात. देवराईचे संवर्धन प्रामुख्याने सर्व जैविक घटकांना जगता यावे, यासाठी केले जाते. आज वाघेरीत वाघाचे अस्तित्त्व असल्याचे सिद्ध झाले आहे. औषधीय वनस्पती, पाण्याचे स्रोत, जैवविविधता टिकवून ठेवण्यात देवराईचे मोठे योगदान असल्याचे केरकर यांनी सांगितले.

दशरथ परब म्हणाले, पर्यावरणक्षेत्रात केरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. यावेळी दशरथ परब व प्रा. राजेंद्र केरकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT