Indigo Flight  Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: इंदूर बायपास करून विमान पोहोचले गोव्यात, शेकडो प्रवासी संतापले

रायपूरहून इंदूरकडे येणारे आणि इंदूरहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याला जाण्यासाठी बुधवारी (दि.19) इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Devi Ahilyabai Holkar International Airport of Indore) दाखल झालेल्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सर्व प्रवाशी गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची वाट पाहत होते.

पण रायपूर ते इंदूर आणि इंदूर ते गोवा असा प्रवास असणाऱ्या या फ्लाईटने इंदूरला बायपास करत थेट गोवा गाठले आणि तेथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

(Raipur to Indore and Indore to Goa flights)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सचे विमान (6E-6219) रायपूरहून सकाळी 11.20 वाजता इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचते आणि 12.25 वाजता गोव्यात पोहोचते.

परंतु बुधवारी कंपनीने ही दोन्ही उड्डाणे रद्द केली. दोन्ही मार्गांवर प्रवासी नसल्याने कंपनीचे विमान रायपूरहून थेट गोव्याला गेले. त्यामुळे रायपूरहून इंदूरकडे येणारे आणि इंदूरहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. कंपनीने प्रवाशांना रिफंड आणि रीबुकिंगचा पर्याय दिल्याची माहिती समोर आलीय.

याआधीही कंपनीने अनेक वेळा आपली उड्डाणे रद्द केली आहेत. बुधवारी रात्री लखनौहून इंदूरला येणारे आणि अहमदाबादला जाणारे विमानही अडीच तास उशिराने निघाले. इंडिगोचे हे विमान लखनौहून इंदूरला रात्री 9.40 वाजता पोहोचते आणि रात्री 10.00 वाजता अहमदाबादला पोहोचते, परंतु बुधवारी हे विमान लखनऊहून इंदूरला सकाळी 10.47 वाजता पोहोचले आणि इंदूरहून अहमदाबादसाठी 11.43 वाजता निघाले. यामुळे प्रवासी चांगलेच संतापले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT