Rains lash Go Rainwater seeped into the house Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पावसाचा हाहाकार; घरात शिरले पावसाचे पाणी

काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने केपे तसेच कुडचडे भागात बऱ्याच ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे तसेच घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत.

दैनिक गोमन्तक

केपे : काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने केपे तसेच कुडचडे भागात बऱ्याच ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे तसेच घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. गुडी पारोडा येथे ग्रासीयस कुटुंबियांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.

काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे गुडी पारोडा येथील ग्रासियस कुटुंबियांच्या घरात रात्री पाणी शिरल्याने त्यांना आपल्या मुलांबाळासह रात्र जागून काढावी लागल्याचे जॉकीना ग्रासियस यांनी सांगितले.

काल रात्रीच याची संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती पण दुपारी एक पर्यंत कुणीच अधिकारी आले नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला.

गेल्या तीन वर्षांपासून सदर पाणी घरात शिरण्याचे प्रकार घडत असल्याने याविषयी स्थानिक पंचायत तसेच संबंधित खात्याच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती पण अध्याप या तक्रारीकडे कानाडोळा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी या घरात पाणी शिरत नव्हते पण एका स्थानिक युवकाने ग्रासियस कुटुंबियांच्या घरामागून वाहत येणाऱ्या पाण्याची वाट अडवल्याने पाणी त्यांच्या घरात शिरत असल्याचे सांगितले

गेल्या वर्षी असेच पाणी भरले होते व यावेळी पोलिसांच्या सहकार्याने पाणी जाण्याची वाट मोकळी करण्यात आली होती पण नंतर सदर वाट परत एकदा दगडी चिरे लावून बंद केल्याने ही स्थती निर्माण झाल्याचे लोकांनी सांगितले.

स्थानिक पंचायत व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ज्या लोकांनी पाणी जाण्याची बंद केली आहे ती त्वरित मोकळी करून द्यावी व आम्हाला न्याय ध्यावा अशी मागणी ग्रासियस कुटुंबीयांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT