गोव्यामध्ये पावसाने सकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे गोवा मेडिकल कॉलेजजवळील सब-वे मध्ये ही पाणी भरले होते. हे पाणी सब-वे मध्ये वीज पुरवठा करणाऱ्या पॅनेलपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तिथल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह असण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्या पाण्यातून जर कुणी गेले असते त्यांना विजेचा शॉक लागण्याची शक्यता होती.
मात्र संभाव्य धोका लक्षात घेत गोवा पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेजजवळील हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात केला आहे. त्यामुळे मोठ्या जीवितहानीचा धोका टळला आहे.
दरम्यान, राजधानी पणजीत ठिकठिकाणी पाणी साचलं असतानाच उत्तर गोव्यालाही पावसाने झोडपून काढलं आहे. पार्से खाजनगुंडो परिसरातही शेतीला पूर्णपणे तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून वाहने चालवतानाही अडचणी येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.