IMD Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: येत्या चार-पाच दिवसांत राज्यात परतणार पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. सध्या मॉन्सूनोत्तर कालावधी सुरू असल्याने पाऊस पडणे, धुके दाटणे, अचानक ऊन पडणे असे बदल घडत आहेत.

(Rain will return to goa state in the next four to five days)

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने 14 ऑक्टोबरच्या आसपास राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे राज्यात येत्या चार-पाच दिवसांत परतीचा पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी वर्तवली आहे.

राहुल म्हणाले की, मॉन्सूनच्या परतीचा प्रवास आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला असून दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातूनही परतीच्या पावसाला सुरुवात होईल. शुक्रवारी व शनिवारी घाट भागासह किनारी पट्‍ट्यातही पाऊस पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूने ट्रफ्स निर्माण झाला आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 3.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत मॉन्सूनोत्तर 27.3 मि.मी.

पावसाची नोंद झाली आहे. पणजी येथे आज कमाल 30.7 तर किमान 24.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT