पणजी: पर्यटन क्षेत्रासाठी अडथळा ठरलेला ‘युके’साठीचा ई-व्हिसा प्रश्न सोमवारपर्यंत सुटणार आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी बोलणी केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोना काळात गृह मंत्रालयाने विविध देशांतील ई-व्हिसा निलंबित केले होते. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचाही (युके) समावेश होता. मात्र, ‘युके’मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येतात.
(UK e-Visa issue will be resolved by Monday )
सध्या पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही प्रणाली अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्यात येणे रद्द केल्याने आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजंट संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ही प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत करून पेपर व्हिसा अर्थात ई-व्हिसा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा करून जुनी प्रणाली सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गृह मंत्रालयाने याला हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या सोमवारपर्यंत ही प्रणाली सुरू होईल, अशी माहिती गृह मंत्रालयाकडून मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.