Rain Update Dainik Gomantak
गोवा

पुढील काही दिवस गोमंतकीयांची छत्री पासून सुटका नाही

पावसाने मोडला 56 वर्षांचा विक्रम!

दैनिक गोमन्तक

Rain Update: दक्षिण विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील ला-निना हवामान स्थिती सक्रिय झाल्याने भारतीय उपखंडात मुसळधार पाऊस पडत आहे. ही स्थिती (Situation) अशीच राहिल्यास आणखीन पावसाची (Rain) शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामान (Weather) आणि मान्सून (Monsoon) शास्त्रज्ञ डॉ.आर.रमेशकुमार यांनी सांगितले.

दरम्यान, डिसेंबरमध्ये पणजीत पडणाऱ्या पावसाने 56 वर्षांचा विक्रम मोडला. 1965 मध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद होती. आज 102.9 मिलीमीटर पाऊस तर मडगावमध्ये काल 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

भारतात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने मान्सूनचे मानले जातात. त्यानंतरचा पाऊस ''मान्सून पश्चात'' म्हणून नोंदविला जातो. हा पाऊस सरासरी 192 मिलीमीटर असतो. यंदा हा 499.7 मिलीमीटर झाला आहे. आणि यंदा तो 160 पट जास्त झाला आहे. तर राज्यात सामान्यपणे 2975.6 मिलीमीटर इतका मान्सूनचा पाऊस पडतो. 2019 मध्ये तो 33 टक्के तर 2020 मध्ये 41 टक्के म्हणजे 4203 मिलीमीटर पाऊस झाला. यंदा 3095.1 मिलीमीटर पाऊस झाला.

मान्सूनच्या सक्रियतेमध्ये ला-निना आणि एल निनो यांच्या स्थितीला खूप महत्त्व असते. यंदा या दोन्ही स्थिती निष्क्रिय होत्या. पण आता ला-निना सक्रिय झाल्याने पावसाचा हंगाम वाढला आहे. ही स्थिती काही दिवसांनी कमी होईल. पण याचा भारतीय उपखंडातील हवामानाबरोबर शेती आणि इतर उत्पादनावर परिणाम होतो.

- डॉ.आर. रमेशकुमार, मान्सून तज्ज्ञ

102 मिलीमीटर पावसाची नोंद

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला आहे. दरम्यान आता डिसेंबर पडणाऱ्या पावसाने 56 वर्षांचा विक्रम मोडला असून 1965 मध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. आज 102 मिलीमीटर पाऊस झाला आहे अशी माहिती गोवा हवामान खात्याचे अधिकारी राहुल मोहन यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

SCROLL FOR NEXT