Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Heavy Rain In Goa: गोव्याला पावसाने झोडपले; आठवडाभर मुसळधारेचा इशारा, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

Monsoon In Goa: उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात पावसाने जोरदार हजेरी लावत राजधानी पणजीसह डिचोली, साखळी आणि वाळपईला पावसाने झोडपले आहे. गोवा हवामान विभागाने दोन दिवसांसाठी (२०, २१ मे) ऑरेंज अलर्ट दिला असून, पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज (मंगळवार) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात दुपारपासून पावसाचे ढग दिसत होते. ढगांच्या गडगडाटासह डिचोली, साखळी, पणजी, पर्वरी, वाळपईत पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विविध ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. पाण्यातून वाट काढताना वाहन चालक आणि नागरिकांना कसरत करावी लागतेय.

गोवा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दोन दिवस ऑरेंज, पाच दिवस यलो अलर्ट

हवामान खात्याने राज्याते आज आणि उद्या (२०, २१ मे) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, २२ ते २६ मे (पाच दिवस) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादिवसांत राज्यात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या काळात नागरिकांना खुल्या भागात, झाडे कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात काम करण्याचे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक पोल, धोकादायक इमारती, पाणी साचण्याची शक्यता असणारी ठिकाणे यापासून दूर राहण्याचे आवाहन देखील विभागाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT