Rain is very likely to be accompanied with thunder lightning and winds of speed around 40 kmph in goa Dainik Gomantaak
गोवा

Goa Rain Updates: राज्यात शनिवारपर्यंत पावसाळाच

पावसाने गोव्याला झोडपले! रस्त्यांवर पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत

दैनिक गोमन्तक

पणजी: बुधवारी रात्रीपासून गुरुवारी राज्याला (Goa) पावसाने (Rain) अक्षरशः झोडपून काढले. 12 च्या सुमारास पणजी (Panaji) शहरात सुरू झालेली संततधार सायंकाळपर्यंत अखंड होती. पावसाच्या संततधार रिपरीपीमुळे राज्यातील (Goa Rain Updates) जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे चार ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सायंकाळी 6 च्या सुमारास जोर धरला. मध्‍यरात्री राज्याच्या अनेक भागांना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्या‍सह पावसाने झोडपले.

आज पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. त्यानंतर काही काळ उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा काल दुपारी 12 च्या सुमारास झोडपले. त्यामुळे पणजी शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी वाहनचालकांची गोची झाली. मेरशी सर्कल येथे महामार्गावर जणू तळे साचले होते, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.

सायंकाळी पाऊस पडेल, असा अंदाज बांधून घराबाहेर पडलेले नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांची दुपारी प्रचंड तारांबळ उडाली. कुठे आसरा घ्यायचा असा प्रश्‍न सगळ्यांना पडला होता. साडेतीनच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतली. सत्तरी, साखळी, पेडणे, वाळपई भागात मात्र रात्री सुरू झालेल्या पावसाची अखंड बरसात सुरू आहे.

शनिवारपर्यंत पाऊस

अरबी समुद्रातील हालचाली वाढल्यामुळे राज्यात शनिवारपर्यंत पर्जन्यवृष्टी होत राहील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. 24 तासांत 2.4 इंच पावसाची नोंद झाली आहे. पर्यटकांसह सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

जवादचा परिणाम नाही

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे थैमान जवळपास सुरू झाले आहे. हे वादळ शनिवारपर्यंत आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहचणार आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम गोव्याच्या किनारपट्टीवर होणार नाही, असा प्राथमिक अंदाज हवामान वेधशाळेचे संचालक एम. राहुल यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केला. सध्या जो पाऊस पडत आहे, तो अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. शनिवारनंतर पाऊस उसंत घेईल. त्यासाठीच अलर्ट जारी करण्यात आलेला नाही, पण दक्षता घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

चार ठिकाणी झाडे कोसळली

बुधवारी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे फोंडा आणि कुडतरी या ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्याने पहाटे दोन्ही मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ झाडे बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. चिंबल येथे वाहनावर झाड कोसळल्याने सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले, तर पिसुर्ले- वाळपई येथे घराच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळून दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये केवळ सुदैवाने जिवीत हानी टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: 'तिसरा जिल्हा' झाल्याने लोकांची सोय होईल, कामे जलद होतील, ही न पटणारी गोष्ट..

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Goa Panchayat: पंचायतींना जीआय फंड देताना दुजाभाव का? सरदेसाईंचा सवाल; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेधले लक्ष

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

SCROLL FOR NEXT