Rain in Goa
Rain in Goa  Danik Gomantak
गोवा

गोव्यात नियोजनाचा फोलपणा ; रस्ते जलमय

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीला राजधानीचा दर्जा मिळून आता 100 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. स्मार्ट सिटी आणि अमृत मिशन अंतर्गत शहरातील बहुतांश कामांचे नूतनीकरण झाले आहे. मात्र, पावसाचा जोर वाढला की पणजी तुडूंब भरते,याचा प्रत्यय गुरूवारी धुवांधार पावसामुळे आला. महापालिकेच्या समोरच तळे साचल्याने नियोजनाचा फोलपणा दिसून आला.

मोठ्या पावसात शहरातील मोठ्या रस्त्यांलगतची दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरते. आजही शहरातील बऱ्याच रस्त्यांवर पाणी आल्याने दोन तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली. दुचाकीस्वारांना तर कसरत करतच मार्ग काढावा लागला.

18 जून रस्ता, दयानंद बांदोडकर मार्ग, आत्माराम बोरकर, पाटो प्लाझा, बसस्थानक परिसर, मिरामार, कांपाल आदी परिसर जलमय झाला होता. मळा आणि नेवगीनगर भागात तर घरे पाण्यात की पाणी घरात, हेच लक्षात येत नव्हते. पावसाचा जोर वाढला की, येथील नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात. काही ठिकाणी पडझडही झाली. सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्त्रोत विभागामार्फत रस्ते दुरुस्ती, पाण्याचा निचरा करण्यावर भर दिला जातो. मात्र, हे सारे तात्पुरतेच आहे का? असा प्रश्न केला जातो.

दोन दिवस ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून 26 आणि 27 हे दोन दिवसही जोरदार पावसाचे दर्शविले आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी. राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा दिला आहे.

घरे, दुकानांमध्ये पाणी

आज सकाळी नऊनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. पणजीत सकाळी 11 नंतर 18 जून रस्त्यावरील पदपथावर पाणी चढले. बांदोडकर रस्ता, दादा वैद्य मार्ग या रस्त्यांवर, तसेच आल्तिनोवरून येणारे पाणी काही घरे, दुकानांत शिरल्याने लोकांची धांदल उडाली.

पाटो पाण्याखाली

गुरुवारी सकाळी दीड तास पडलेल्या पावसाचे पाणी पाटो परिसरात साचले. त्यामुळे ईडीसीने हस्तांतरित केलेल्या पाटो भागातील गटारांची सफाई मनपाने किती गांभीर्याने केली, असा प्रश्‍न उपस्थित झाला. कला व संस्कृती खात्यासमोरील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT