गोवा मराठी चित्रपट महोत्सव ऑगस्टमध्ये!

नियोजन सुरू : कला अकादमीच्या दुरुस्तीकामामुळे आयोजकांपुढे अडचण
Goa Marathi Film Festival
Goa Marathi Film Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेला गोवा मराठी चित्रपट महोत्सव यावर्षी ऑगस्टमध्ये आयोजित करण्‍याबाबत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे मराठी सिनेरसिकांना प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले आणि नुकतेच प्रदर्शित झालेले नवे कोरे चित्रपट पाहण्‍याची मेजवानी मिळणार आहे. (Goa Marathi Film Festival)

Goa Marathi Film Festival
कोमुनिदाद दुरुस्तीनंतर मुलींनाही हक्क : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात

2019 मध्ये गोवा मराठी चित्रपट महोत्सवाने आयोजनाचे एक तप पूर्ण केले. परंतु 2020 व 2021 मध्ये कोरोनाचे संकट असल्याने महोत्सव होऊ शकला नाही. दुसरीकडे गोव्यात होत असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2020 आभासी पद्धतीने झाला. त्यानंतर 2021 मध्ये मर्यादित उपस्थिती ठेवून इफ्फीचे आयोजन पार पडले. इफ्फीला केंद्र व राज्य सरकारचा हातभार लागत असल्याने तो महोत्सव साजरा करण्यात अडथळे आले नाहीत. परंतु पावसाळ्यात होत असलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सव दोन वर्षे झाला नाही.

राज्यातील मराठी सिनेरसिकांना या महोत्‍सवाचे खास आकर्षण असते. अनेकजण या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. एरवी जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा महोत्सव होतो. ‘विन्सन वर्ल्ड’ ही संस्था हा महोत्सव खासगी स्तरावर आयोजित करते.

Goa Marathi Film Festival
सत्तरीत डेंग्यूच्या रुग्णांत वाढ ; गावागावांत उपाययोजना

अधिक क्षमतेच्या थिएटरची गरज

कला अकादमीची दुरुस्ती सुरू असल्याने तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला मुख्य थिएटर उपलब्धतेची अडचण येतेय. सध्‍या याबाबत विचार सुरू असून विन्सन वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक, गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे संस्थापक संजय शेट्ये व त्यांचे सहकारी मुंबईत ठाण मांडून आहेत. यावर्षी महोत्सव होईल, नियोजन सुरू आहे, असे त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com