Goa Farmers Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: परतीच्या पावसानं बळीराजा हैराण, सलग दुसऱ्यांदा पिकांची नासधूस; भरपाईची होतेय मागणी

Crop Damage from Post Monsoon Rain: मुसळधार पावसामुळे बार्देशसह इतर भागांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: शेतीसाठी पाऊस महत्वाचा असतो असं म्हणतात मात्र अजूनही राज्यातून पाऊस काही परत जाण्याचं नाव घेत नाहीये आणि परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतोय. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीची पुन्हा पेरणी करावी लागली होती आणि आता काढणीपर्यंत आलेली ही प्रक्रिया पावसामुळे लांबली आहे. गोव्यात अजून सुरु असलेल्या पावसामुळे पीक आडवं झालंय आणि त्याला पुन्हा कोंब फुटायला लागलेत.

शेतीचे दोनवेळा नुकसान

पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरणीवर लक्ष केंद्रित केलं, मात्र यानंतर पावसाचा अतिरेक झाला, बियाणं वाहून गेली आणि म्हणूनच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिकांची पेरणी करावी लागली. दुसऱ्यांदा केलेली शेतीची लागवड चांगलं पीक देत होती म्हणून राज्यातील शेतकरी आनंदाला होता मात्र यावेळी परतीच्या पावसाने जोर धरल्याने कापणीसाठी तयार असलेली बियाणं आडवी झाली. शेतात साचलेल्या पाण्यामुळे या बियाणांना कोंब येऊ लागलेत आणि बार्देश तसेच इतर भागांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.

राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना कापणीसाठी काही मशीन उपलब्ध करून दिल होती. सध्या राज्यात पावसाच्या उपद्रवावमुळे शेतकरी या यंत्रांचा वापर करू शकत नाही. ओल्या शेतजमिनीत या मशीनचा वापर करणं त्यांच्यासाठी कठीण झालंय.

पावसामुळे एकदा नाही तर दोनवेळा शेतीचे नुकसान झालं आहे आणि म्हणूनच राज्यातील शेतकरी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करतायत. कृषी विभागीय अधिकारी संपती धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत चार शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे अर्ज दाखल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT