Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

Goa Ashtami Fair 2026: मांडवी किनारी महानगरपालिकेतर्फे भरविण्यात आलेल्या अष्टमीच्या फेरीला गर्दी वाढू लागली आहे.
Goa Ashtami Fair 2026
Goa Ashtami FairDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवी किनारी महानगरपालिकेतर्फे भरविण्यात आलेल्या अष्टमीच्या फेरीला गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर कर्मचारी वर्ग फेरीकडे वळत असून, पणजीच्या आसपासच्या परिसरातूनही नागरिक खरेदीसाठी येत आहेत.

मांडवी किनाऱ्यावरील पदपथावर दरवर्षीप्रमाणे विविध वस्तूंचे स्टॉल्‍स सजले आहेत. सध्या फेरीत महिलांची संख्या अधिक दिसत असून, कपड्यांच्या खरेदीला विशेष पसंती मिळत आहे. लाकडी फर्निचरचे स्टॉल्‍सही सजले असले तरी त्याला सध्या मर्यादित प्रतिसाद मिळत आहे.

Goa Ashtami Fair 2026
Goa Beach Shacks: तब्बल 450 शॅक होते, नोंदणीविनाच! शॅकवरही पर्यटन खात्याचा अंकुश; नोंदणी आता अनिवार्य

काही ग्राहक आगाऊ रक्कम देऊन फर्निचर निश्चित करत आहेत. ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध असतानाही फेरीत प्रत्यक्ष खरेदी करण्याची आणि फेरफटका मारण्याची नागरिकांची सवय कायम असल्याचे गर्दीवरून दिसत आहे. खरेदी न करणारे नागरिकही केवळ फेरफटका मारण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.

महानगरपालिकेने स्टॉलधारकांसाठी काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. फेरीतून मनपाला भाड्यापोटी मोठा महसूल मिळत असला, तरी त्या तुलनेत अपेक्षित सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी विक्रेत्यांकडून होऊ लागल्या आहेत.

कार्यालये सुटली की कर्मचारी फेरीच्‍या दिशेने

दिवसभराच्या कामानंतर कार्यालयीन कर्मचारी तसेच पणजीच्या आसपासच्या परिसरातील नागरिक सायंकाळच्या वेळेत अष्टमीच्या फेरीकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. खरेदीसोबतच केवळ फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

Goa Ashtami Fair 2026
Goa Medical Act: गोवा वैद्यकीय हिंसाचार कायद्याचे कलम 7 घटनात्मक आहे का? उच्च न्यायालयात आव्हान; राज्य सरकारला उत्तरासाठी 3 आठवड्यांची मुदत

फर्निचरसाठी आगाऊ बुकिंग

लाकडी फर्निचरच्या स्टॉल्सना सध्या मर्यादित प्रतिसाद मिळत असला, तरी काही ग्राहक आगाऊ रक्कम देऊन वस्तू निश्चित करत आहेत. गणपतीच्या आदल्या दोन दिवसांत फर्निचर घरी नेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.लाकडी फर्निचरच्या स्टॉल्सना सध्या मर्यादित प्रतिसाद मिळत असला, तरी काही ग्राहक आगाऊ रक्कम देऊन वस्तू निश्चित करत आहेत. गणपतीच्या आदल्या दोन दिवसांत फर्निचर घरी नेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com