Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Talha Saeed Anti India Speech Pakistan Rally: मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रॅली काढून भारताला उघड धमक्या दिल्या.
Talha Saeed Anti India Speech Pakistan Rally
Talha SaeedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Talha Saeed Anti India Speech Pakistan Rally: मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रॅली काढून भारताला उघड धमक्या दिल्या. तल्हाने दिल्लीवर ताबा मिळवण्याचा आणि जिहादचा राग आळवण्यासोबतच पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरची जाहीर प्रशंसा केली. या नापाक वक्तव्यावरुन हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि तेथील लष्कर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

दिल्ली जिंकण्याच्या आणि जिहादच्या वल्गना करणाऱ्या या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने दिलेल्या धड्याची कदाचित विस्मृती पडली. 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारतीय सैन्याने सीमापार घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ज्या लष्कर आणि जैशच्या ठिकाणांना पाकिस्तानी लष्कर पाठीशी घालत होते, ते क्षणात जमीनदोस्त करण्यात आले. या धडाकेबाज कारवाईत अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले. हाफिज सईदने ही कारवाई स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, तरीही या दहशतवाद्यांची विकृत मानसिकता बदललेली नाही.

Talha Saeed Anti India Speech Pakistan Rally
India VS Pakistan: वर्ल्ड कप नाही, आशिया कपही नाही... तरीही भिडणार भारत-पाकिस्तान; 'आयसीसी'चा मेगा प्लॅन तयार

हाफिज सईद तुरुंगात असल्याचा बनाव रचणारा पाकिस्तान आता त्याच्या मुलाला पुढे करुन नवी कारस्थाने रचत आहे. तल्हा सईदने शेखूपुरा आणि पंजाबमध्ये रॅली काढून असीम मुनीरच्या धार्मिक कट्टरतेचा आधार घेत चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा संदर्भ देत दिल्लीवर मुस्लिम राजवटीचा दावा ठोकणे आणि जिहादच्या धमक्या देणे, यावरुन पाकिस्तान भारतात पुन्हा मोठा घातपात घडवण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते.

Talha Saeed Anti India Speech Pakistan Rally
Pakistan Child Abuse Report: लहान मुलांसाठी पाकिस्तान नरक! बाल शोषणाच्या बाबतीत लाजिरवाणा रेकॉर्ड; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

परंतु, पाकिस्तान (Pakistan) आणि त्याच्या पोसलेल्या दहशतवाद्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हा नवा भारत आहे. भारत केवळ सीमेचे रक्षण करत नाही, तर घरात घुसून हिशोब चुकता करतो. तल्हा सईद किंवा पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी कितीही कटकारस्थाने रचली, तरी भारताच्या अखंडतेला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नापाक इराद्याला मातीत मिळवण्याची ताकद भारतीय सैन्याकडे आहे. जर या दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम आधीपेक्षाही अत्यंत भयानक आणि विनाशकारी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Slams Pakistan UN General Assembly
India Exposes Pakistan At UNHRC
Journalist Confronts Pakistani PM Over Terrorism
Hafiz Saeed Close Aide Shot Dead Karachi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com