Margao
Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगावात फातीमा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानावर छापा; दोघांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Margao : रेल्वे सुरक्षा बलाने मोहिम राबवत एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुकानावर छापा टाकला आहे. ही कारवाई मडगावातील ईएसआय हॉस्पीटल जवळील फातीमा टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुकानावर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 62 बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रे जप्त केली असून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा पोलिस दलाचे पोलिस निरिक्षक विनोद मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी आम्हाला सुत्रांकडुन रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मडगावातील ईएसआय हॉस्पीटल जवळील फातीमा टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुकानावर छापा टाकला. या छाप्यात 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 62 बनावट ओळखपत्र व कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांचा वापर कथितरित्या रेल्वे तिकीट बुकींगसाठी वापर केला जात होता. या छाप्यामध्ये लाखोंची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत.

छाप्यात लाखो रुपयांच्या रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. काही तिकिटांचा प्रवास झाला असुन काही तिकीटांवरुन प्रवास व्हायचा आहे. बनावट आयडी तयार करुन ही तिकीटे मिळवण्यात येत होती व ज्यादा रक्कम घेऊन प्रवाशांना विकली जात होती असे मिश्रा यांनी सांगितले. ज्या तिकीटांचा प्रवास झालेला नाही ती तिकीटे लगेच ब्लॉक करण्यात येतील. आणखी तिकीटे जप्त करण्याची बाकी असुन माहिती मिळविण्यात येत आहेत. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असुन चौकशी सुरु आहे असेही मिश्रा यानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

SCROLL FOR NEXT