Goa Boat : गोव्यातील बोटींवर महाराष्ट्रात कारवाई; 10 लाखाचा दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण

मिसीपीसी १ व स्टार ऑफ विलीनकिनी-२ अशी पकडण्यात आलेल्या दोन्ही बोटींची नावे
boats
boatsDainik Gomantak

Maharashtra : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन पर्ससिननेट बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक नौकांना साधारण 5 लाख असा 10 लाखाचा दंड ठोठावण्यता आला आहे. सागरी सुरक्षा शाखेच्या पोलिसांची गस्त सुरू असताना आरे-वारे परिसरात मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन पर्ससिन नौका पकडण्यात आल्या.

boats
Goa Agriculture: शेतकऱ्यांना शेती करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजीपाला लागवडीचे मार्गदर्शन

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन पर्ससिननेट बोटींवर सुधारित कायद्यानुसार सहायक मत्स्य आयुक्तांनी प्रत्येक २ लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे प्रत्येक नौकांना साधारण 5 लाख असा 10 लाखाचा दंड ठोठावण्यता आला आहे. मोठ्या प्रमाणात दंड आकारणी होत असल्याने या कारवाईमुळे भविष्यात घुसखोरीला लगाम बसणार आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर भगवती बंदरात बोटी आणण्यात आल्या. तेथे रत्नागिरी मत्स्यखात्याच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या.

boats
Varsha Usgaonker: 'गोवेकर असल्याचा मला अभिमान', मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरकडून मोपाचे कौतुक

दरम्यान या दोन्ही बोटींवर तांडेलसह सुमारे ३०, ३५ खलाशी होते. परंतु मत्स्य विभागाने त्यांची जबाबदारी घेतली नाही. त्यांना तांडेलच्या स्वाधीन करण्यात आले. मिसीपीसी १ व स्टार ऑफ विलीनकिनी-२ अशी पकडण्यात आलेल्या दोन्ही बोटींची नावे आहेत. मत्स्य विभागाने दोन्ही बोटींवरील मासळीचा पंचनामा केला. यामध्ये एका बोटीवर 8 हजार ३०२ किलो तारली सापडली होती. याचा जाहीर लिलाव करण्यात आला. तिघांनी त्यामध्ये भाग घेतला आणि 66 हजार 416 बोलीवर लिलाव झाला. ती शासनदरबारी जमा करण्यात आल्याचे दोन्ही नौकांविरुद्ध सहायक मत्स्य आयुक्तांकडे एम. व्ही. भादुले यांच्याकडे खटला चालला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com