Velsao Double Tracking Project Problem
वास्को: रेल्वे दुपदरीकरणाच्या कामात कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोलो-वेळसांव गावात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वे विकास निगम लिमिटेडला जमिनीचे सीमांकन हलवल्याचा आणि ऐतिहासिक आंब्याचे झाड तोडल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे.
मालमत्तेचे मालक अल्बर्टो रॉड्रिग्ज यांनी वेर्णा पोलिस आणि मुरगाव उपजिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रारी दाखल केल्या असून त्यात रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या कामगारांनी गोवा लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून खासगी मालमत्तेवर बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केल्याचा दावा केला आहे.
रेल्वे विकास निगमने अनिवार्य सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण न करता माझ्या मालमत्तेवर बांधकाम सुरू केले. त्यामुळे माझी मालमत्ता धोक्यात आली आहे, असे रॉड्रिग्ज यांनी तक्रारीत म्हटले आहे. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते असा दावा करतात की, सरकारी सर्वेक्षणानंतर २० आणि २१ डिसेंबर रोजी भूमी अभिलेख रेल्वे कामगारांनी खासगी जमिनीवरील सीमांकन रेषा चार मीटरपर्यंत हलविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आमच्याकडे रेल्वे विकास निगमचे कर्मचारी समांतर सर्वेक्षण करत असल्याचे आणि सीमांकन रेषा बदलत असल्याचे व्हिडिओ पुरावे आहेत, हे जमीन कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे स्थानिकांचे समर्थन करणारे गोएंचो एकवोटचे संस्थापक ऑर्विल दोरादो रॉड्रिग्ज म्हणाले. रेल्वे विकास निगमवर सर्व्हे नंबर १८/१ मधील जमिनीवर योग्य सीमांकन आणि कायदेशीर मंजुरी न घेता अतिक्रमण केल्याचा आरोपही रहिवासी करतात. येथे जे काही घडत आहे ते बेकायदेशीर आहे. अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्वेक्षण करावे व सीमांकन बदलून काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही ऑर्विल रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.