
पणजी: मांद्रे येथील आस्कावाडा भागातील पास्क्वल बारजवळ २२ ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित ट्रकचालक मंगल राय (३६) यांची पेडणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणात राय यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (बेफिकीरपणे वाहन चालविणे) आणि ३०४-अ (निष्काळजीपणाने मृत्यू घडविणे) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने नमूद केले की, चालकाने इतरांच्या जीवितासंबंधी बेदरकारपणा दाखविला असल्याचे ठोसपणे सिद्ध करणे आवश्यक होते मात्र या प्रकरणातील सादर केलेले पुरावे ते स्पष्ट करीत नाहीत. सरकारी पक्षाने पोलिसांची बाजू मांडताना केलेल्या युक्तिवादात, राय हा ट्रक बेफिकीरपणे चालवत होता आणि त्याच्या वाहनाची धडक इलेक्ट्रिक स्कूटरला बसली होती.
त्यामुळे दुचाकीचालक गौरी म्हामल यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश शबनम प्रताप नागवेकर यांनी नमूद केले की, अपघात झाल्याचे आणि त्यात मृत्यू झाल्याचे सिध्द झाले असले तरी आरोपीने वाहन निष्काळजीपणे चालविले हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.