Goa Live News: माशे येथे नरकासुर स्पर्धा गोंधळात, दोघांना अटक; नंतर जामीन मंजूर

Goa marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये
goa marathi breaking news
goa marathi breaking newsDainik Gomantak

माशे येथे नरकासुर स्पर्धा गोंधळात, दोघांना अटक; नंतर जामीन मंजूर

काणकोण येथील माशेम येथे नरकासुर स्पर्धेदरम्यान जोरदार वाद झाला, ज्यामुळे लोलीये येथील रोनी फर्नांडिस आणि पैंगिण येथील राजेंद्र चारी या दोन सहभागींना ताब्यात घेण्यात आले. नरकासुर मिरवणुकीच्या मार्गावर जाण्यावरून झालेल्या वादातून ही हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही व्यक्तींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले.

धावे सत्तरीत मारुती मंदिरात श्रीकृष्ण पूजन उत्साहात, नागरिकांकडून परंपरा कायम

नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे सत्तरी येथील मारूती मंदिरात दिवाळीच्या आदल्या दिवशी काल रविवारी रात्री श्रीकृष्ण पूजन करून एक आदर्श निर्माण केला आहे. एरव्ही राज्यभर आदल्या दिवशी श्रीकृष्णा ऐवजी नरकासूराचा उदोउदो केला जातो. पण धावे येथील ब्राम्हणवाडीतील नागरिकांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पुजन केले. मंदिराचे पुजारी तथा पत्रकार पद्माकर केळकर यांनी पुजा केली. तर पुरोहित श्रीधर भावे यांनी पूजा सांगितली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पुरोहीत श्रीधर भावे म्हणाले अनिष्ठ गोष्टींना फाटा देण्याची गरज असून धावें वासियांनी ठेवलेला आदर्श हा स्त्ुत्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा सुरु ठेवली आहे असे भावे म्हणाले. यावेळी आरती म्हणून सर्वांना गुळपोहे प्रसाद म्हणून वितरीत करण्यात आले.

समेस्त गोंयेकरांक, दिवाळीची परबी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com