Velsao: रेल्वे दुपदरीकरणासाठी वेळसावात सीमांकन होणार सुरु; मंत्री सिक्वेरांनी दिली माहिती

Velsao Double Tracking Railway Project: वेळसाव येथील रेल्वे दुपदरीकरणासाठीचे जमिनीचे सीमांकन २० डिसेंबरपासून सुरू होईल. हे सीमांकन एक-दोन दिवसांत पूर्ण होईल.
Double Tracking Railway Project
Double Tracking Railway ProjectCanva
Published on
Updated on

Double Tracking Railway Project Velsao

सासष्टी: वेळसाव येथील रेल्वे दुपदरीकरणासाठीचे जमिनीचे सीमांकन २० डिसेंबरपासून सुरू होईल. हे सीमांकन एक-दोन दिवसांत पूर्ण होईल, असे पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

सिक्वेरा यांनी सांगितले की, सीमांकन न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये थोडा गैरसमज पसरलेला आहे. आजच आपण रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तेथील कामाचा आढावा घेतला. एकदा सीमांकन पूर्ण झाले की लोकांच्या मनामधील गैरसमज दूर होतील. तरी काही लोकांमध्ये गैरसमज राहिले तर ते सामोपचाराने दूर करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजोर्डा-उतोर्डा-कलाता येथील रेल्वे रुळावरून उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. या संदर्भात आपण रेल्वे अधिकाऱ्यांशी बोललो व त्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. शिवाय तेथे केवळ दुचाकीसाठी वेगळा उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्तावही पुढे केला आहे. तिथेच एक शाळा आहे व विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी मैदान आहे. मुलांना अपघात होऊ नये व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री सिक्वेरा यांनी दिली.

भोगती तळ्याच्या स्वच्छतेसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने किंवा मामलेदाराने या तळ्याची पाहणी रद्द केली त्यास आपण जबाबदार नाही. या संदर्भात कोणीही आपल्याकडे संपर्क साधलेला नाही. आपल्याला उगीच त्यात गोवले जात आहे. भोगती तळ्याच्या परिसरातील शेतजमिनीत शेतकऱ्यांना पीक काढायचे आहे. गेल्या पाच वर्षांपासून या तळ्याचे पाणी प्रदूषित झाल्याने तिथे पीक काढणे शक्य होत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

नोटरीबाबतचे विधान पूर्ण अभ्यासाअंती

बेकायदेशीररीत्या जागा संपादन प्रकरणी काही नोटरींचा हात आहे, असे जे आपण विधान केले ते पूर्ण अभ्यासाअंती केले आहे. काही वकिलांनी त्यास आक्षेप घेतला. पंतप्रधान कार्यालयातही तक्रार केली. तरी आपण आपले विधान मागे घेणार नाही. जाधव अहवाल वाचला तर त्यात कोणकोण जबाबदार आहेत हे कळेल, अशी पुस्तीही मंत्र्यांनी पुढे जोडली.

Double Tracking Railway Project
धक्कादायक! 'दयानंद' योजनेचे लाभार्थी परदेशात; 4 हजार नावे हयात नसल्याची माहिती उघड

पार्किंगसाठी जागा

मडगावमधील नूतन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे, हे आपल्याला मान्य आहे. आपण कंत्राटदारांशी बोलणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. यासंदर्भात सोमवारी बैठक बोलावली आहे. जिल्हा सत्र न्यायालय व नूतन न्यायालयासाठी पार्किंगची जागा उपलब्ध नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावतो आहे. न्यायालयाच्या बाजूला असलेली जागा संपादन करणार आहे. याप्रकरणी कायदा खात्याने प्रक्रिया सुरू केली आहे. या जागेचा मालकही पार्किंगसाठी जागा सरकारला देण्यास राजी आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मिटेल, असा विश्र्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.

Double Tracking Railway Project
Vasco Akkalkot: स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी! वास्को ते अक्कलकोट थेट बससेवा सुरु

सुरावलीतही उड्डाणपूल

सुरावलीतही साबांखाने उड्डाणपूल बांधण्याची तयारी दाखवली आहे. या पुलासाठी साबांखाने जागा संपादन केली होती. या जागेवर आता अतिक्रमण झाले असून साबांखा आता संपादन केलेल्या जागेचे सर्वेक्षण करून सीमांकन करणार आहे, अशी माहिती मंत्री सिक्वेरा यांनी दिली. आपण या ंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलणार आहे, असेही मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com