Raia Gram Panchayat Dainik Gomantak
गोवा

Raia Gram Panchayat: राय पंचायतीत कोलांट उड्या सुरुच; सरपंच पदाची माळ पुन्हा ज्युडास क्वादृस यांच्या गळ्यात

सरपंच म्हणून काम करायला फक्त तीन महिने मिळाले - क्वादृस

गोमन्तक डिजिटल टीम

राय ग्रामपंचायतीमध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सत्तांतर झाले. कारण रायचे सरपंच ज्युडास क्वादृस यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झाला. यानंतर रायचे सरपंच पद अँथनी बार्बोजा यांच्या गटाकडे सरकले होते. यानंतर आता पुन्हा सरपंच पदी जुडास क्वाद्रोस यांची निवड झाली आहे. त्यामुळे सत्ता वर्चस्वातून राय पंचायतीत कोलांट उड्या सुरुच आहेत.

(Raia Gram Panchayat Judas Quadros has been re-elected as Sarpanch)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुडास क्वाद्रोस यांना पुन्हा सरपंचपदी निवडले गेले असून आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स गटाला पुन्हा एकदा सत्ता प्राप्त झाली आहे. कारण राय पंचायतीत जुना गट पुन्हा एकत्र आला असून यामुळे जुडास क्वाद्रोस यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली आहे.

...अन् क्वादृस यांना सरपंच पद सोडावे लागले

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राय ग्रामपंचायतीमध्ये अँथनी बार्बोजा गट व आमदार आलेक्स रेजीनाल्ड गट यांच्यात सत्ता वर्चस्ववातून सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली. यातून तत्कालीन उप सरपंच ओस्वल्ड सोजा व पीटर क्वादृस या दोघांनी विरोधी गटाशी हात मिळवणी केली. व रायचे सरपंच ज्युडास क्वादृसयांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झाला आणि त्यातून क्वादृस यांना सरपंच पद सोडावे लागले होते.

मला सरपंच म्हणून काम करायला फक्त तीन महिने मिळाले

जुडास क्वाद्रोस यांनी पदावरुन पायउतार होताना म्हटले होते की, मला विश्वासांत घेत नाही असे म्हणणारा पंच सदस्य पीटर क्वादृस हा 27 नोव्हेंबरपर्यंत आमच्याबरोबर होता आणि त्याच्याच घरी आम्ही बैठक घेतली होती. अकस्मात त्यांना मी त्यांच्यावर अविश्वास दाखवतो हा साक्षात्कार कधी झाला असा सवाल क्वाद्रोस यांनी केला.

मला सरपंच म्हणून काम करायला फक्त तीन महिने मिळाले त्यातील दोन महिने मागची थकीत कामे मार्गी लावण्यात खर्च झाली. मला विकासकामे करण्यासाठी वेळ तरी मिळायला नको होता का असा सवाल त्यांनी केला? होता. यामुळे त्यांच्या गळ्यात पुन्हा सरपंच पदाची माळ पडल्याने त्यांना विकास कामे करण्याची संधी ही मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT