Rahul Mhambare said Politics of money has no place in Aam Aadmi Party  Dainik Gomantak
गोवा

पैशांपासून ‘आप’ दोन हात दूरच!

रेजिनाल्डना 15 कोटींची ऑफर, ही अफवाच: राहुल म्हांबरे

दैनिक गोमन्तक

मडगाव: आम आदमी पार्टी (AAP) हा स्वच्छ आणि शुचिर्भूत राजकारणावर(Goa Politics) विश्वास ठेवणारा पक्ष असून या पक्षाच्या राजकारणात पैशांच्या राजकारणाला अजिबात थारा नाही, अशी माहिती ‘आप’चे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) यांनी दिली.

काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना ‘आप’मध्ये सामील होण्यासाठी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, अशी अफवा राजकीय वर्तुळात सध्या पसरली आहे. त्यावर त्यांना विचारले असता, हा थिल्लरपणा आहे. वास्तविक ही अफवा प्रतिक्रिया देण्याइतकीही महत्त्वाची नाही. प्रतिमा कुतिन्हो ज्यावेळी ‘आप’मध्ये सामील झाल्या होत्या, त्यावेळीही अशा अफवा पसरविल्या होत्या. राजकीय विरोधकांना तशी सवयच जडली आहे, असे ते म्हणाले.

आमच्या पक्षात केवळ स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच प्रवेश देत आहोत. आम्हाला गोव्यातील राजकीय घाण दूर करायची आहे. ‘आप’ची पार्श्वभूमी तपासून पाहिल्यास कुणाचाही या अफवेवर विश्वास बसणार नाही, असे म्हांबरे म्हणाले.

गोव्यात परिवर्तन घडवणार : व्हिएगस

‘आप’चे दक्षिण गोव्यातील सक्रिय सदस्य तथा प्रदेश समितीचे उपाध्यक्ष कॅ. व्हेंझी व्हिएगस यांनीही ही केवळ अफवा असून त्यात अजिबात तथ्य नाही, असे सांगितले. आम्ही ‘आप’मध्ये येणाऱ्यांना तुम्हाला येथे काम करण्याचे समाधान मिळणार. तुम्हाला तुमच्या हातातून गोव्यात चांगले परिवर्तन आणल्याचे समाधान मिळणार, एवढेच सांगतो. त्यामुळेच आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात लोक सामील होऊ लागले आहेत. गोव्यात परिवर्तन केवळ ‘आप’च आणू शकतो, यावर लोकांचा विश्वास बसू लागला आहे, असे व्हिएगस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT