Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: राहुल गांधींमुळेच जातनिहाय जनगणनेचा निर्णय! गोवा काँग्रेस नेत्यांचा दावा; भाजप कार्यालयापुढे आनंदोत्सव

Caste Census: केंद्रातील भाजप सरकारने जरी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही मागणी मूलतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरली होती.

Sameer Panditrao

पणजी: केंद्रातील भाजप सरकारने जरी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही मागणी मूलतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरली होती. राहुल गांधी यांच्या मागणीमुळे सर्व बाजूंनी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याने अखेर भाजपला जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी आनंदोत्सव साजरा केला.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनापासून फेरी काढली. राहुल गांधींच्या नावाच्या घोषणा देत एमजी रोडवरून ही फेरी तांबा इमारतीपर्यंत आणि तेथून डॉ. पी. शिवगावकर रस्त्यावरून आत्माराम बोरकर मार्गावरील भाजप कार्यालयाकडे फेरी गेली. भाजपच्या कार्यालयाच्या खाली घोषणाबाजी करीत, फटाके वाजवत आणि लाडूंचे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.

आमदार फेरेरा म्हणाले, जातीजनगणना झाल्यास प्रत्येक जातीची किती टक्केवारी आहे, हे समजून येईल आणि त्यांना किती फायदा देता येईल, हे ठरविणे योग्य होईल. केवळ पैसे देऊन चालणार नाही. भाजपला जातीजनगणना नको होती, त्यामुळेच त्यांनी या मागणीला लोकसभेत विरोध केला. परंतु राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली आणि जातीजनगणनेची गरज व्यक्त केली. इंडियाच्या पक्षांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला नमते घ्यावे लागल्याचे ते म्हणाले.

अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली, तेव्हा भाजप त्यांचे ऐकूनही घेत नव्हते. परंतु राहुल यांनी हा मुद्दा ठामपणे मांडला त्यामुळेच भाजप सरकारला ही मागणी मान्य करावी लागली. काँग्रेसचा हा विजय आहे, त्यामुळे आम्ही त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपच्या कार्यालयासमोर आलो आहोत.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

राहुल गांधी यांनी पदयात्रा काढल्यामुळे त्यांना समाजातील चढ-उतार समजून आले. एसटी-एससी, ओबीसी व इतर खालच्या जाती-धर्मातील लोकांत असमानता दिसून आली. त्यामुळेच राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणनेची गरज व्यक्त केली. कोणत्याही सरकारी योजनेत पारदर्शकता असावी यासाठी या जनगणनेची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT