Viriato Fernandese Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: भाजपमध्ये गेलेल्यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश नाही! राहुल गांधींचा आदेश; कॅ. विरियातोंनी दिली माहिती

Viriato Fernandese: कॉंग्रेसच्या तिकिटावर कळंगुटमधून निवडून येऊन नंतर स्वार्थासाठी मायकल लोबो भाजपात गेले अशी टीकाही फर्नांडिस यांनी केली.

Sameer Panditrao

कळंगुट: कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या फुटिरांना यापुढे कॉंग्रेस पक्षात बिलकूल प्रवेश देऊ नका, असा आदेश कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कळंगुटात दिली.

कळंगुट येथील कॉंग्रेस गट समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कॉंग्रेसच्या तिकिटावर कळंगुटमधून निवडून येऊन नंतर स्वार्थासाठी मायकल लोबो भाजपात गेले अशी टीकाही फर्नांडिस यांनी केली.

मागच्या निवडणुकीत जे राज्यात घडले ते कपोलकल्पित नव्हते तर ठरवून केलेले भाजपचे षडयंत्र होते, यंदाही त्याच गोष्टीचा पाठपुरावा आगामी निवडणुकीत होणार असून त्यासाठी आमदार मायकल लोबो यांच्यासाठी भाजपकडून नवीन स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू असल्याचे कॅप्टन विरियातो यांनी सांगितले. कळंगुटच्या मतदारांनी आमदार लोबो यांची खेळी यापुढे उद्‍ध्वस्त करून टाकावी,असे आवाहन कॅप्टन विरियातो यांनी यावेळी केले.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी शापोरा येथे कोपरा बैठकीत कॅ. विरियातो यांनी शिवोली मतदारसंघातील पक्ष संघटन मजबूत करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या समस्या समजून घेऊन कार्य करावे,असेही ते म्हणाले.

यावेळी, शिवोली कॉंग्रेस गट समितीच्या अध्यक्षा पार्वती नागवेकर, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, सेवा दलाचे प्रमुख राजन घाटे, जिल्हा उपाध्यक्ष चंदन मांद्रेकर, सामाजिक कार्यकर्ते कपील कोरगांवकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT