Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

Vote Chori: 'सगळे गाव राहते एकाच घरात'! राहुल गांधींचा आरोप; बिहारमधील 947 मतदारांबाबत दावा

Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर नवा आरोप करताना असा दावा केला, की बिहारच्या मसुदा मतदारयाद्यांमध्ये गया जिल्ह्यातील संपूर्ण गावच एका घरात राहत असल्याचे दाखवले गेले आहे.

Sameer Panditrao

पाटणा: काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर नवा आरोप करताना असा दावा केला, की बिहारच्या मसुदा मतदारयाद्यांमध्ये गया जिल्ह्यातील संपूर्ण गावच एका घरात राहत असल्याचे दाखवले गेले आहे.

काँग्रेसने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे, की गया जिल्ह्यातील बारा चट्टी विधानसभा मतदारसंघातील निदानी गावात एका मतदान केंद्रावरील सर्व ९४७ मतदार ‘घर क्रमांक सहा’चे रहिवासी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

काँग्रेसने नमूद केले, की हा प्रकार फक्त एका गावाबाबत असेल तर मग राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर किती मोठ्या प्रमाणात अनियमितता असू शकते याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

दरम्यान, बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. गया जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘एक्स’ खात्यावर याबाबत एक पोस्ट प्रसिद्ध केली. त्यात स्पष्ट केले आहे, की ज्या गावांमध्ये किंवा झोपडपट्टी वस्त्यांमध्ये घरांना प्रत्यक्ष मालिका क्रमांक नसतात, तिथे ‘काल्पनिक/नाममात्र घर क्रमांक’ देण्यात येतो.

मुदतवाढीसंदर्भात सुनावणीस मान्यता

बिहारमधील निवडणूक तोंडावर असताना मतदारयादीच्या फेरपडताळणी मोहिमेसंदर्भात दावे अन् आक्षेप दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याच्या राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि आणि ‘एआयएमआयएम’ या पक्षांच्या मागण्यांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली. आता या अर्जांवर १ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

राहुल गांधींनी माफी मागावी

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् त्यांच्या दिवंगत मातुःश्रीविषयी बिहारमध्ये काढण्यात आलेल्या ‘वोटर अधिकार यात्रे’दरम्यान अपशब्द वापरण्यात आले. त्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे,’’ अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Issue: 'तक्रार द्या, 24 तासांत खड्डे बुजवू' मंत्री दिगंबर कामतांचं आश्वासन

Bicholim: कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, तर खबरदार..! मुख्यमंत्र्यांनी दिला सज्जड इशारा

Goa: राज्यात दरवर्षी 450 व्‍यापारी परवाने होतात रद्द, जीएसटी न भरण्‍याचा परिणाम, जमा न करणाऱ्यांविरोधात कारवाई

Goa Weather Update: नवरात्रोत्‍सव काळात पावसाचे 'विघ्‍न' नाही! गेल्‍या 24 तासांत राज्‍यात पावसाची नोंद नाही

IND vs PAK: शाहीन-हॅरिससोबत का भिडला अभिषेक शर्मा? सामन्यानंतर सांगितली पाकड्यांची संपूर्ण कहाणी Watch Video

SCROLL FOR NEXT