Rahul Dravid Leg Injury Dainik Gomnatak
गोवा

Rahul Dravid: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! राहुल द्रविडवर नेटिझन्सचा कौतुकाचा पाऊस, प्लॅस्टर घालून लावली सराव सत्राला उपस्थिती

Rahul Dravid Leg Injury: राजस्थान रॉयल्सने बुधवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये राहुल द्रविड डाव्या पायाला प्लास्टर लावलेले दिसत आहेत.

Sameer Panditrao

जयपूर: इंडियन प्रीमियर लीगची रणधुमाळी (IPL) 2025 अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेवली आहे. सर्व संघ जोरात तयारीला लागले आहेत. राजस्थान रॉयल्स देखील याला अपवाद नाही. त्यांनीही या सीझनसाठी जोरात प्रक्टिस सुरु केली आहे.

काल राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ते वॉकरच्या साहाय्याने चालत सरावाच्या सत्रात सहभागी झालेले दिसले. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल झाला. राहुल द्रविड यांच्या पायाला एका छोट्या अपघातात दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे ते संघाच्या तयारीस येऊ शकतील का अशी शंका असताना द्रविड जयपूरमध्ये क्रचेसच्या मदतीने सराव शिबिरात सहभागी झाले.

ही दुखापत त्यांना बेंगळुरूमधील एका क्लब सामन्यात डाव्या पायाला झाली होती. राजस्थान रॉयल्सने बुधवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये राहुल द्रविड डाव्या पायाला प्लास्टर लावलेले दिसत आहेत.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते – "मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, ज्यांना बेंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना दुखापत झाली, ते सध्या बरे होत आहेत आणि जयपूरमध्ये संघात सामील होतील." जरी त्यांचा डावा पाय वॉकिंग बूटने सुरक्षित ठेवलेला असला, तरीही द्रविड पूर्ण सराव सत्रात सक्रिय राहिले. त्यांनी खेळाडूंशी, सपोर्ट स्टाफशी संवाद साधला आणि खेळाडूंच्या शॉट सिलेक्शनवर चर्चा केली.

राजस्थान रॉयल्सने द्रविड प्रशिक्षण शिबिरात आल्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या समर्पणाची भरभरून प्रशंसा झाली. राहुल द्रविड नेहमीच आपल्या शिस्तीसाठी ओळखले जातात. २०११ ते २०१५ दरम्यान राजस्थान रॉयल्ससाठी खेळलेल्या या माजी कर्णधाराने २०१४ मध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT