Goa Agriculture | Farm Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: गोवन ब्रँड म्हणून नाचणी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणार; CM प्रमोद सावंत

गोवा राज्य जैवविविधता मंडळाने (GSBB) विकसित केलेल्या गोवन ब्रँड अंतर्गत नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा राज्य जैवविविधता मंडळाने (GSBB) विकसित केलेल्या गोवन ब्रँड अंतर्गत नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केली. स्वयंपूर्ण गोवा 2.0 मोहिमेअंतर्गत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सावंत यांनी पंचायतींना नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यास सांगितले तसेच त्यांच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन घेण्याचा सल्ला दिला.

(Ragi to be promoted under Govan brand says CM pramod sawant)

गोवा प्लास्टिकमुक्त करणे ही पंचायतींची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले. मनुष्यबळ विकास, कौशल्यपूर्ण गोमंतकीय युवक घडवण्यासाठीही पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी गोवन ब्रँड म्हणून नाचणी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘स्थानिकांनी नोकऱ्यांचा लाभ घ्यावा’

सरकारी नोकरीत सर्वांनाच नोकऱ्या मिळू शकत नाहीत. मात्र, कौशल्य विकास शिक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के नोकऱ्या देण्याची ताकद सरकार तसेच खासगी उद्योग क्षेत्राकडे असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत केला होता. ते म्हणाले, की पर्यटन क्षेत्राच्या आदरातिथ्य, आयटी, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सिटी तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत होत आहे. त्याचा फायदा गोमंतकीय युवकांनी घ्यावा. आसाम तसेच इतर राज्यांतील युवक हे गोव्यात ‘व्हाईट कॉलर जॉब’ करतात. या संधीचा स्थानिकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

Today's Live Updates Goa: शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT