Goa Politics | Amit Patkar
Goa Politics | Amit PatkarDainik Gomantak

Goa Politics: विरोधी पक्षनेत्यांपेक्षा फुटिरांना सुरक्षेची जास्त गरज- अमित पाटकर

Goa Politics: असा टोला मुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
Published on

Goa Politics: सभापतींनी विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिलेले युरी आलेमाव यांना आतापर्यंत सुरक्षा पुरविण्‍यात आलेली नाही. उलट माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना दिलेले सुरक्षारक्षक आजही त्यांच्या सेवेत असल्याचे समजते.

पक्षांतर करणाऱ्या फुटिरांना सुरक्षेची जास्त गरज असावी असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. पाटकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, आलेमाव यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिल्यानंतर जवळपास 22 दिवस उलटून गेले आहेत.

Goa Politics | Amit Patkar
Goa News: बहुजनांना आरक्षण द्या, अन्‍यथा आंदोलनाचा इशारा!

तरीही त्यांना सुरक्षा का दिली गेली नाही, हे पोलिस महासंचालकांनी स्पष्ट करावे. विरोधी पक्षनेते या पदाचा हा विशेषाधिकार आहे. पोलिस खात्याने सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असा सल्लाही पाटकर यांनी दिला आहे.

माजी आमदार बाबू कवळेकर यांनी घटनात्मक स्थान नसलेले उपमुख्यमंत्रिपद भूषविले होते. त्यांना अजूनही सुरक्षा आहे. भाजप सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्‍याचे हे एक उदाहरण आहे, असेही पाटकर यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com