Digambar Kamat, Pramod Sawant and Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये निकालाआधीच 'रस्सीखेच'

मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. गोवेकरांनी कोणत्या राजकीय पक्षाला पसंती दिली आहे हे उद्या दुपार पर्यंत स्पष्ट होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निकालाआधीच कॉंग्रेस आणि भाजप मधील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवार दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले आहेत.

मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. भेटीनंतर सावंत म्हणाले, "मला विश्वास आहे की गोवेकर मला पुन्हा एकदा सेवेची संधी देतील."

गोवा कॉंग्रेसच्या वतीने मायकाल लोबो यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. कॉंग्रेस मधून दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि मायकल लोबो मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे.

एक्झिट पोल भाजपला अनुकूल नाहीत
एकाही एक्झिट पोलनमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत नाही. ही आकडेवारी खरी ठरल्यास भाजपला (BJP) सत्तास्थापनेसाठी युती शिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सुदिन ढवळीकर यांनी प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे देखील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT