Science Day
Science DayDainik Gomantak

होंडा सत्तरी हायस्कूलमध्ये विज्ञान दिन कार्यक्रम उत्साहात साजरा

सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
Published on

वाळपई: होंडा हायस्कूल-सत्तरी येथे विज्ञानदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत पेडणेकर, ज्येष्ठ शिक्षिका तृप्ती राणे, लता राणे, वर्षा पोकळे, मंदा गावस, साची गावस, ललिता गावस, विज्ञान शिक्षिका स्नेहा नाईक, अनिता गावस, श्याम गावस व प्रयोगशाळा साहाय्यक विलास देसाई आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक अभिजीत पेडणेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

Science Day
गोव्यात उद्या 3 तासात निकाल स्पष्ट होणार: निवडणूक अधिकारी

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण यावेळी मुख्याध्यापक अभिजीत पेडणेकर तसेच ज्येष्ठ शिक्षिका तृप्ती राणे, लता राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी सानिया गावस हिने वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांची जीवनविषयक माहिती सांगितली. वंश खोर्जुवेकर या विद्यार्थ्याने जागतिक विज्ञान दिवसाचे महत्त्व सांगितले. संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर केले. यावेळी मुख्याध्यापक पेडणेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयोगशील असले पाहिजे. हेच प्रयोग विद्यार्थ्याचे भवितव्य घडवतील. आजच्या या युगात स्वकुशलता फार महत्त्वाची आहे. सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहा नाईक यांनी तर शिक्षिका अनिता गावस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com