Goa Pradesh Youth Congress submitted a statement to the administration Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यातील रस्ता अपघातांवर त्वरित तोडगा काढा

गोवा प्रदेश युवा काँग्रेसची मागणी : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोवा सरकार व राज्य प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप गोवा प्रदेश युवा काँग्रेस समितीने केला आहे. राज्यात रस्ता अपघातांमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याकडे लक्ष वेधताना दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष महेश नाडर यांनी वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नाडर यांनी सुरक्षेसंबंधीच्या त्रुटी दाखवून देताना यावर तोडगा काढून भविष्यातील दुर्घटना टाळण्याचे आवाहन केले आहे. नाडर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, केवळ सामन्य नागरिकांनाच नव्हे तर गोवा पोलिसांनादेखील राज्य प्रशासनाच्या रस्ता सुरक्षेसंबंधीच्या संथ कारभाराचा फटका बसत चालला आहे.

क्रॅश बॅरियर्स, योग्य दिशादर्शक फलक, योग्य रस्ता आखणी व धोकादायक क्रॉसिंग बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. राजकीय दबावापोटी मुख्य हमरस्त्यांना जोडणारे अनेक लहान-मोठे रस्ते खुले करण्यात आल्याचे यावेळी नाडर यांनी दाखवून दिले. या वाढत्या अडथळ्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्ंयांनादेखील जीव मुठीत धरावा लागत आहे.

तसेच मडगावच्या आसपासच्या परिसरात काही धोकादायक क्षेत्रे आहेत. यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पॉवर हाऊस ते आर्लेम रस्ता हा वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे, बोर्डा सेंट ज्योकिम चॅपेल रस्त्यावर अतिरिक्त गतिरोधकांची गरज आहे.

जवळपासच्या भागातील इस्पितळांची संख्या पाहता हे तातडीने होणे गरजेचे आहे. चौगुले कॉलेजकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला आहे. येथे बॅरिकेट््स, धोक्याची सूचना देणारे फलक उभारलेले नाहीत. आवश्यक ठिकाणी गतिरोधक तसेच बॅरिकेट््स रात्रीच्या वेळी दृष्टिस पडण्यासाठी चमकणारा रंग त्यावर मारण्याची गरज असल्याची मागणी युवा काँग्रेसने केली आहे.

कधीही न संपणाऱ्या रस्ता खोदाई तसेच मलनिस्सारणाच्या कामामुळे राज्यातील रस्ते वाहन चालवण्यायोग्य राहिलेले नाहीत. मडगाव बसस्थानकासमोरील रस्ता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हा रस्ता केवळ धोकादायकच नसून कायम वाहतूक कोंडी करणारा आहे. हा संपूर्ण पट्टा अपघातास निमंत्रण देणारा आहे.

कित्येकवेळा रस्त्यांचे खोदकाम केल्याने बसेसना आत शिरण्याासाठी व बाहेर पडण्यासाठी खूप कमी जागा मिळते. यात अन्य वाहने, स्थिरावलेली वाहने, विक्रेते, हातगाडीवाले असल्याने वाहतुकीस धोकादायक आहे.

- महेश नाडर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT