Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

Digambar Kamat Margao garden cafeteria proposal: प्रभव नायक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनीच मडगाव नगरपालिका उद्यानात कॅफेटेरिया आणि प्रदर्शन हॉल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता, असा दावा केला.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव नगरपालिका उद्यानात दोन मजली इमारत बांधण्याच्या प्रस्तावावर वाद सुरू असतानाच, मडगावचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनीच मडगाव नगरपालिका उद्यानात कॅफेटेरिया आणि प्रदर्शन हॉल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता, असा दावा केला.

मडगाव पालिकेच्या उद्यानाच्या सौंदर्यीकरण प्रस्ताव नेमका कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी उद्या १९ रोजी शॅडो कौन्सिलने बैठक बोलावली आहे. ही बैठक नगरपालिका उद्यानात सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

२८ नोव्हेंबर २०२४ रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अधिकृत नोंदीचा संदर्भ देत, दिगंबर कामत यांनी सदर प्रस्तावात विद्यमान शेड पाडून तेथे दोन मजली इमारत उभारण्याची व त्यात कॅफेटेरिया आणि प्रदर्शन हॉल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती असे प्रभव नायक यांनी सांगत या संबंधी कामत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या अधिकृत नोटची प्रत सादर केली.

Digambar Kamat
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

आमदार गणेशोत्सव पूजनाची जागा दुसरीकडे हलवू पाहत आहेत, असा आरोप करताना आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावात गणेशोत्सवाचा कोणताही उल्लेख का नाही? असा सवालही नायक यांनी उपस्थित केला.

उद्यानाच्या एकूणच दुरुस्ती व विकासासाठी कोणतीही सर्वसमावेशक योजना कामत यांनी का मांडली गेली नाही, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. “म्हजे मडगाव म्हजे गार्डन” या मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्यान वाचवण्याचे आवाहन करत आहेत.

कॅफेटेरिया म्हणजे रेस्टॉरंट नव्हे!

दिगंबर कामत यांना विचारले असता, अशी नोट आपण मुख्यमंत्र्यांना पाठवली होती, मात्र हे कॅफेटेरिया म्हणजे रेस्टॉरंट नव्हे, तर त्या प्रस्तावित इमारतीच्या वरच्या उघड्या स्वरूपात असलेल्या मजल्यावर ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी बसण्याची, खानपानाची सोय अशा तऱ्हेचा हा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी सध्या मडगाव पालिकेचा गणेशोत्सव होतो, ती जागा बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही.

Digambar Kamat
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

गणेशोस्तव वर्षातून एकदाच होतो. त्यानंतर या जागेचा चांगला उपयोग व्हावा, यासाठी प्रदर्शन हॉलचा प्रस्ताव ठेवला होता. तो समाजाच्या उपयोगासाठी. या जागेत लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा, दिंडीच्या वेळी रांगोळी स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे या जागेत प्रदर्शने भरविल्यास त्याची कुणाला अडचण होणार नाही, असे कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com