ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

FC Goa vs Mumbai City FC ISL 2026 result: साहिल ताव्होरा याने पहिला गोल केल्यानंतर ४५+३ व्या मिनिटास मुहम्मद नेमिलने डाव्या पायाच्या दूरवरील फटक्यावर एफसी गोवाची आघाडी २-० अशी मजबूत केली.
FC Goa vs Mumbai City FC ISL 2026 result
FC Goa vs Mumbai City FC ISL 2026 resultDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रतिस्पर्धी बलाढ्य असला, तरी आपला संघ जिंकण्यासाठी प्रेरित असल्याचा विश्वास एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक यांनी शुक्रवारी व्यक्त केला होता, शनिवारी त्यांच्या संघाने मार्गदर्शकाचे शब्द तंतोतंत खरे ठरविताना अफलातून विजयी धडाका राखला, त्यामुळे अव्वल स्थानावरील मुंबई सिटी एफसीची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित दौड फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खंडित झाली.

सामन्याच्या २९ व्‍या मिनिटास साहिल ताव्होरा याने पहिला गोल केल्यानंतर ४५+३ व्या मिनिटास मुहम्मद नेमिलने डाव्या पायाच्या दूरवरील फटक्यावर एफसी गोवाची आघाडी २-० अशी मजबूत केली. त्या जोरावर संघाने घरच्या मैदानावर सलग दुसरा, तर स्पर्धेतील चौथा विजय नोंदविला.

FC Goa vs Mumbai City FC ISL 2026 result
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

एफसी गोवाचे आता नऊ लढतीतून १६ गुण झाले असून त्यांनी तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे. त्यांचा पुढील सामना नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध २४ एप्रिल रोजी गुवाहाटी येथे होईल.

पहिल्या गोलवेळी देयान द्राझिचने कॉर्नर किक मारल्यानंतर पोल मोरेनो याने हेडिंग साधले, त्यावेळी आयुष छेत्रीचा फटका रोखला गेला, पण वेळीच चेंडूवर झडप टाकत साहिलने मुंबई सिटीच्या बचावफळीतून अचूक जागा हेरली. पाहुण्या संघाचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपा दुसऱ्यांदा चकला तेव्हा त्याला नेमिलने अंदाजे ३५ यार्डावरून मारलेल्या सणसणीत फटक्याचा अजिबात अंदाज आला नाही.

FC Goa vs Mumbai City FC ISL 2026 result
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

स्पर्धेत पाच विजय व तीन बरोबरीनंतर मुंबई सिटीला पहिला पराभव पत्करावा लागला. त्यांचे नऊ लढतीतून १८ गुणांसह अग्रस्थान अबाधित राहिले असले, तरी दुसऱ्या क्रमांकावरील मोहन बागान संघाचा त्यांच्यापेक्षा फक्त एक गुण कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com