GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

GCA Premier League 2026 Final: कर्णधार स्नेहल कवठणकर याच्या फलंदाजीतील जबरदस्त सातत्याच्या बळावर धेंपो क्रिकेट क्लबने गोव्यातील ‘चॅम्पियन’ क्लबचा मान मिळविला.
GCA Premier League
GCA Premier LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्णधार स्नेहल कवठणकर याच्या फलंदाजीतील जबरदस्त सातत्याच्या बळावर धेंपो क्रिकेट क्लबने गोव्यातील ‘चॅम्पियन’ क्लबचा मान मिळविला. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर त्यांनी शनिवारी गतविजेत्या चौगुले स्पोर्टस क्लबला पहिल्या डावातील आघाडीमुळे मात देत गोवा क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जिंकली. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्नेहलने पहिल्या डावात द्विशतक (२४१) व दुसऱ्या डावात नाबाद शतक (११९) झळकावण्याचा विक्रम केला.

चार दिवसीय पिंक बॉल डे-नाईट अंतिम सामना अनिर्णितावस्थेत राहिला. धेंपो क्लबसाठी पहिल्या डावातील १४९ धावांची आघाडी निर्णायक ठरली. त्यांनी पहिला डाव ९ बाद ६४६ धावांवर घोषित केला, नंतर चौगुले क्लबचा डाव ४९७ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात धेंपो क्लबने २ बाद १६ वरून शनिवारी सामना अनिर्णित राखण्यात आला तेव्हा ७ बाद २३५ धावा केल्या.

GCA Premier League
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

त्यांच्यापाशी एकूण ३८४ धावांची आघाडी जमा झाली. स्नेहलने नाबाद शतक ठोकताना १६३ चेंडूंत १५ चौकार व एक षटकार ठोकला. त्याने मोहित यादव (नाबाद २८) याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी १०५ धावांची अभेद्य भागीदारी केली. याशिवाय पहिल्या डावातील शतकवीर अमन धूपर याने ४० धावा केल्या. चौगुले स्पोर्टस क्लबचा कर्णधार डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने १०० धावांत ४ गडी टिपले. त्याने स्पर्धेतील सहा सामन्यांत सर्वाधिक ४४ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

GCA Premier League
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

कर्णधाराची अफलातून फलंदाजी

धेंपो क्लबचा कर्णधार स्नेहल कवठणकर याने अंतिम सामन्यात फक्त एकवेळ नाबाद राहत ३६० (२४१ व नाबाद ११९) धावा केल्या. या ३० वर्षीय अनुभवी रणजीपटूने स्पर्धेत एकूण सहा सामन्यांतील दहा डावांत ८६च्या सरासरीने सर्वाधिक ७७४ धावांचा पाऊस पाडला. त्याने तीन शतके ठोकताना दोन अर्धशतकांचीही नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com