Quepem Municipality Dainik Gomantak
गोवा

Quepem Municipality: केपे नगराध्यक्षांना हटवण्याची विरोधकांकडून जोरदार मागणी कारण...

केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे.

दैनिक गोमन्तक

Quepem Municipality: केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी पदाचा गैरवापर करून आपल्याच मुलाला पालिकेत कामावर घेतल्याने त्यांना अपात्र करण्याचे लेखी निवेदन नगरपालिका संचालकांना दिले असल्याचे नगरसेवक अमोल काणेकर यांनी पत्रकार पारिषदेत सांगितले.

केपे पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक लुर्डस फर्नांडिस, आलिंदा लासेर्दा ज्योकिना डायस आणि आंजेलिस्ट डिकॉस्ता उपस्थित होते. नगराध्यक्षा शिरवईकर या केपे पालिका त्यांच्या मालकीची असल्यासारखे निर्णय घेत आहेत.

पालिका मंडळाला विश्वासात न घेताच आपला मुलगा भुतेश शिरवईकर याला एमटीएस स्टाफ म्हणून नियुक्त केल्याचे काणेकर यांनी सांगितले. केपे पालिकेच्या कनिष्ठ कारकुनाने राजीनामा दिला होता.

ती जागा भरण्यासाठी कुणालाही विश्वासात न घेता भुतेश याची नेमणूक केली. ही नियुक्ती कोणत्या आधारावर केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यावेळी भुतेश यांना कामावर घेतले होते, त्या चार दिवसांत सुचिता रजेवर गेल्या होत्या. त्या मुद्दाम रजेवर गेल्याचे सिद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT