Mapusa Municipality: म्हापसा पालिकेत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; 31 जानेवारीला निवडणूक होणार

यंदा महिलांसाठी राखीव असलेल्या म्हापसा नगराध्यक्ष पदासाठी 31 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.
Mapusa Municipality
Mapusa MunicipalityDainik Gomantak

Mapusa Municipality: यंदा महिलांसाठी राखीव असलेल्या म्हापसा नगराध्यक्ष पदासाठी 31 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन संचालकांनी नोटीस जारी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 30 जानेवारीपर्यंत असेल.

पालिका प्रशासक संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी नोटीस जारी करीत हा आदेश काढला. या नोटिसीनुसार 31 रोजी सकाळी 11 वाजता म्हापसा नगराध्यक्ष पदासाठी पालिकेत निवडणूक होणार आहे. यासाठी पालिका मंडळाची विशेष बैठक बोलावली आहे.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बार्देशचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई हे उपस्थित असतील, तर इच्छुकांना या पदासाठी 30 जानेवारी दुपारपर्यंत मुख्याधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावे लागतील. हे अर्ज सध्या म्हापसा पालिकेत उपलब्ध केले आहेत.

Mapusa Municipality
Road Accident: कुंकळ्ळी येथे अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू

11 जानेवारीला शुभांगी वायंगणकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. सध्या म्हापशाचे प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर हे आहेत. सध्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप सत्ताधारी मंडळाकडून दोन नार्वे चर्चेत आहेत.

यामध्ये प्रभाग 10 च्या नगरसेविका प्रिया मिशाळ आणि प्रभाग ६च्या डॉ. नूतन बिचोलकर यांच्या समावेश आहे. त्यातही मिशाळ यांचे नाव आघाडीवर असून स्थानिक आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचे समजते. सध्या सत्ताधाऱ्यांकडे वीस नगरसेवकांपैकी 14 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

Mapusa Municipality
Goa Police: आभिमानास्पद ! गोवा पोलिसांना एकाचवेळी चार राष्ट्रपती पदके

विरोधकांचे लॉबिंग सुरू

  • 27 जानेवारीला स्थानिक आमदारांची सत्ताधारी नगरसेवकांसोबत बैठक.

  • यावेळी संभाव्य नगराध्यक्षांच्या नावावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब.

  • निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न.

  • मात्र, निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी विरोधकांचे लॉबिंग.

  • निवडणुकीनंतर उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर देणार राजीनामा.

  • उपनगराध्यक्षपदी विराज फडके यांच्या नेमणुकीचे संकेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com