Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Quepem Accident: 'खुल्लम खुल्ला' गांजा विकणाऱ्यांवर कारवाई कधी? अपघातानंतर 'केपे'वासीयांचा संतप्त सवाल

Quepem Crime News: वाहनाचा चालक अमलीपदार्थाच्या नशेत होता हे त्याच्या गाडीत सापडलेल्या गांजामुळे स्पष्ट झाले आहे. सध्या केपे भागात हा एक चर्चेचा विषय ठरला असून केपेतील पोलिस खुल्लम खुल्ला गांजा विकणाऱ्यावर कारवाई का करीत नाहीत, असा संतप्त सवाल केपेवासीय करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Accident News

केपे: पेडामळ - केपे येथे २० रोजी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकींना भरधाव वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात कादर बादशा हा युवक जागीच ठार झाला होता, तर एक युवक गंभीर जखमी झाला होता. अपघात ज्या वाहनाने जोरदार धडक दिली, त्या वाहनाचा चालक अमलीपदार्थाच्या नशेत होता हे त्याच्या गाडीत सापडलेल्या गांजामुळे स्पष्ट झाले आहे. सध्या केपे भागात हा एक चर्चेचा विषय ठरला असून केपेतील पोलिस खुल्लम खुल्ला गांजा विकणाऱ्यावर कारवाई का करीत नाहीत, असा संतप्त सवाल केपेवासीय करीत आहेत.

या प्रकरणी काल २१ रोजी सकाळी पेडामळ भागातील युवकांनी पोलिस स्थानकावर धडक देऊन या प्रकरणी दोषी असलेल्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली होती. कारण अमलीपदार्थाचे सेवन करून रस्त्यावरून बेफाम वाहन हाकल्याने हा अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे होते.

केपे भागात कित्येक मोडीफाईड वाहने फिरत आहेत या वाहनांवर वेळीच कारवाई केल्यास असे अपघात टळू शकतात असे नगरसेवक प्रसाद फळदेसाई यांनी सांगितले. ज्याप्रमाणे अपघातास कारणीभूत वाहनांमध्ये गांजा आढळून आला आहे ते पाहता केपे भागात गांजाची खुली विक्री केली जाते हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या रात्री हा अपघात झाला, त्या रात्री पोलिसांनी कार घटनास्थळाहून काढण्यासाठी जी तत्परता दाखवली ती कोणत्या कारणासाठी असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला.

केपे गांजा विक्रीत नंबर एकवर असल्याचे सांगून केपे पोलिस गांजा विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत. कारण आपण स्वतःहून अनेकवेळा पोलिसांना केपे भागात कुठे कुठे गांजाची विक्री केली जाते हे दाखवतो असे सांगूनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. केपे पोलिस वाहनचालकांना चलन देण्यासाठी नंबर एकवर असून अमलीपदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्यास त्यांचे हात धजावत नाहीत. -
दयेश नाईक, नगरसेवक, केपे पालिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT