Goa Crime: गोव्यात 'बंटी-बबली'चा धुमाकूळ, बनावट कागदपत्रांद्वारे घातला गंडा, महिनाभरानंतर ऐवढ्या किंमतीचे सोने जप्त

Valpoi Police Fraud Crime: कुख्यात ‘बंटी-बबली’ जोडप्याविरोधात कारवाई करताना वाळपई पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून ४४ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. विदिशा आणि विजयनाथ गावडे अशी त्‍यांची नावे आहेत.
Gold Theft
Gold TheftCanva
Published on
Updated on

वाळपई: कुख्यात ‘बंटी-बबली’ जोडप्याविरोधात कारवाई करताना वाळपई पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून ४४ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. विदिशा आणि विजयनाथ गावडे अशी त्‍यांची नावे आहेत. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली त्‍यांना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती.

हे जोडपे डिचोली आणि दोडामार्ग येथे मालमत्ता खरेदीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून गुंतवणूकदारांना फसवत होते. त्‍यांच्‍याकडून सोने घेत होते. चेक किंवा प्रतिज्ञापत्राद्वारे ते विश्‍‍वास संपादन करायचे व नंतर मालमत्ता सोडाच, पैसेही देत नसत.

धुळेर-म्‍हापसा येथील आयसीआयसीआय बँकेत या बंटी-बबलीने १३ लाख १५ हजार २२८ रुपये किमतीचे सोने गहाण ठेवले व त्‍यावर ९ लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. म्‍हापसा येथील याच बँकेच्‍या शाखेत ३० लाख ८१ हजार ९०६ रुपये किमतीचे सोने गहाण ठेवले, ज्‍यावर २३ लाख ११ हजार ४१३ रुपयांचे मंजूर झाले. पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून एकूण ४३ लाख ९७ हजार १३४ रुपयांचे सोने जप्‍त केले आहे.

बँकांचा निष्काळजीपणा कारणीभूत

विशेष म्हणजे बँकांनी कोणतेही वैध बिल न घेता हे सोने स्वीकारून गहाण ठेवून घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरबीआयच्‍या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. अशा बँकांवर आरबीआयने कारवाई करावी, कारण बँकांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात असे गुन्हे घडण्यास प्रोत्‍साहन मिळते, असे वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी सांगितले.

Gold Theft
Margao Crime: रात्री बार बंद झाल्यानंतर दारु न दिल्याने खून; आरोपीला चार वर्षानंतर जन्मठेप

विविध पोलिस स्‍थानकांत ४ गुन्‍हे नोंद

विदिशा आणि विजयनाथ या जोडप्याला १३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती, परंतु न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पीडित गुंतवणूकदारांनी आता पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्‍यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्‍यान, या दाम्‍पत्‍याविरोधात वाळपई पोलिस स्‍थानकात दोन तर डिचोली व फोंडा पोलिस स्‍थानकात फसवणुकीचे प्रत्‍येकी एक प्रकरण नोंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com