Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Quelossim Senior Citizen Suspicious Death: केळशीत एका विहिरीत 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

Manish Jadhav

केळशी: केळशी एका विहिरीत 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तिवोफील कादोझ असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृत्यूच्या स्वरुपावरुन हा आत्महत्येचा नसून खुनाचा प्रकार असावा, असा दाट संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला. मृतदेह विहिरीत ज्या अवस्थेत सापडला, त्यावरुन हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनीही नाकारलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्याभोवती दोरी गुंडाळलेली होती, ही बाब सर्वात जास्त संशयास्पद मानली जात आहे. इतकेच नव्हे तर, ज्या विहिरीत मृतदेह सापडला, त्याच विहिरीत एक खुर्चीदेखील आढळून आली. गळ्यात दोरी आणि सोबत विहिरीत खुर्ची सापडल्याने हा निव्वळ अपघात किंवा आत्महत्या नसून कोणीतरी जाणीवपूर्वक केलेला घातपात असावा, अशी चर्चा केळशी वाड्यातील लोकांमध्ये सुरु आहे. कादोझ यांच्या घराच्या अगदी जवळच ही विहीर असून, सकाळी मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तिवोफील कादोझ हे अविवाहित होते आणि ते त्यांच्या विवाहित बहिणीसोबत घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घराच्या परिसरात काही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींचा वावर होता, अशी माहितीही समोर आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी सुरु केली आहे. पोलिस निरीक्षक डायगो प्रासियस यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सध्या पोलिसांनी या प्रकरणाची नोंद 'अनैसर्गिक मृत्यू' म्हणून केली असली, तरी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या घटनेमुळे शांत असलेल्या केळशी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. जर हा खुनाचा प्रकार असेल, तर त्यामागे मालमत्तेचा वाद आहे की अन्य काही वैयक्तिक कारण, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सध्या पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करुन पुराव्यांची जमवाजमव करत असून, पुढील तपास वेगाने सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT