Quelossim Beach  Dainik Gomantak
गोवा

Quelossim Beach: किनारा आहे की कचराकुंडी? केळशी बीचवर कचऱ्याचे साम्राज्य; मृत माशांचा खच

Goa Beach: तीन दिवस हा किनारा साफ न केल्‍याने आता तिथे दुर्गंधी पसरू लागली आहे, अशी माहिती स्‍थानिक पंच चार्ल्स रॉड्रिग्स यांनी दिली.

Sameer Panditrao

मडगाव: मागचे तीन दिवस वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून नदीतून समुद्रात वाहून आलेली जलपर्णी आणि इतर वस्‍तू किनाऱ्यावर येऊन पडल्‍याने केळशी किनाऱ्यावर जणू कचऱ्याचे साम्राज्‍य निर्माण झाले आहे.

मागचे तीन दिवस ही जलपर्णी तशीच किनाऱ्यावर पडत असून ती साफ न केल्‍यास कुजून किनाऱ्यावर दुर्गंधी पसरणार, अशी भीती केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांनी व्‍यक्‍त केली आहे. या जलपर्णीबरोबरच मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे किनाऱ्यावर येऊन पडले आहेत.

तीन दिवस हा किनारा साफ न केल्‍याने आता तिथे दुर्गंधी पसरू लागली आहे, अशी माहिती स्‍थानिक पंच चार्ल्स रॉड्रिग्स यांनी दिली. या कचऱ्यामुळे समुद्रात बाेटी घेऊन पर्यटकांना जलसफर घडवून आणण्‍याचे कामही सध्‍या बंद ठेवले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

प्रशासनाचे दुर्लक्ष

साळ नदीच्‍या काठी मोठ्या प्रमाणावर अशी जलपर्णी वाढलेली असून पावसात नदीतील पाणी समुद्रात येते. या पाण्‍याबराेबरच कचराही वाहून येतो आणि समुद्राच्‍या लाटांबरोबर ताे किनाऱ्यावर येऊन पडतो. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही आतापर्यंत कोणतीही उपाययोजना न केल्याने सरपंच वाझ यांनी खंत व्‍यक्‍त केली. जिल्‍हा प्रशासनाने या घटनेकडे आपत्तीजनक घटना या दृष्‍टीने पाहून ती दूर करण्‍यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणीही त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT