Quelossim News: 13 वर्षांत एकही बेकायदा काम नाही! केळशी सरपंचांचा दावा; बससेवा, भूमिगत वाहिन्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

Quelossim Panchayat: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी ग्राम विकास समितीच्या सदस्यांसमवेत बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची गुरुवारी भेट घेतली व पंचायत क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा केली. दरम्यान, गेल्या १३ वर्षांत पंचायत क्षेत्रात एकही बेकायदा काम झाले नसल्याचा दावा सरपंच वाझ यांनी केला.

Kelosim | KelshiDainik Gomanatk
Published on
Updated on

Quelossim Panchayat News

सासष्टी: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी ग्राम विकास समितीच्या सदस्यांसमवेत बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची गुरुवारी भेट घेतली व पंचायत क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा केली. दरम्यान, गेल्या १३ वर्षांत पंचायत क्षेत्रात एकही बेकायदा काम झाले नसल्याचा दावा सरपंच वाझ यांनी केला.

केळशीत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा प्रश्न उग्र झाला असून पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने स्थानिकांची कुचंबणा होत आहे. रविवारी तर एकही बस उपलब्ध नसते, याकडे आमदाराचे लक्ष वेधण्यात आले.

मोबोर जेटीवर बेकायदा मासेमारी केली जाते. मासळी उतरविण्यासाठी जागा उपलब्ध नसतानाही तिथे उतरवली जाते, याकडे लक्ष वेधले. तसेच इतर सर्व किनारी भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येत आहेत, मग केळशी पंचायत क्षेत्रातच भूमिगत वाहिन्या का नाही? वीजमंत्र्यांनी आश्र्वासन देऊनही केळशी पंचायतीकडे दुर्लक्ष केल्याचे सरपंच डिक्सन वाझ यांनी यावेळी सांगितले.

केळशी पंचायत क्षेत्रात बेकायदा कामांबाबत जे आरोप केले जात आहेत ते राजकीयदृष्टीने असल्याचे वाझ यांनी सांगितले. गेल्या १३ वर्षांत केळशी पंचायत क्षेत्रात कोणतेही बेकायदा प्रकल्प, उद्योग धंदे, हॉटेल वगैरे झालेले नाही. पंचायतीतर्फे कुठल्याही मेगा प्रकल्पाला मान्यता किंवा परवानगी देण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.

जागा विक्रीबद्दल जो आरोप केला जातो, त्यात पंचायतीची चूक काय? स्थानिकच आपली जागा इतरांना विकतात, त्यात पंचायत हस्तक्षेप करू शकत नाही, असे वाझ म्हणाले.

केळशी समुद्र किनाऱ्यावर सुमारे २५ लाख रुपये खर्चून जलस्रोत खात्यातर्फे वाळूच्या पिशव्यांची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. त्यासाठी पंचायतीची परवानगी देखील घेण्यात आलेली नाही. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे व संपूर्ण किनाऱ्यावर करण्यात आलेले नसल्याचेही वाझ यांनी सांगितले.

Quelossim Panchayat: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी ग्राम विकास समितीच्या सदस्यांसमवेत बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची गुरुवारी भेट घेतली व पंचायत क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा केली. दरम्यान, गेल्या १३ वर्षांत पंचायत क्षेत्रात एकही बेकायदा काम झाले नसल्याचा दावा सरपंच वाझ यांनी केला.
Reis Magos: 'रेईश मागूश' बाबतीत थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार; बांधकामांसाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

भटक्या कुत्र्यांसाठी निवाऱ्याची सोय

भटक्या कुत्र्यांसाठी आम्ही पिंजरे, खाण्याची ठिकाणे व निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करणारी कदाचित केळशी पहिली पंचायत असेल, असे वाझ यांनी सांगितले. या व्यवस्थेचे उद्‍घाटन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com