PWD no road digging rule Dainik Gomantak
गोवा

Goa Road: हॉटमिक्‍स डांबरीकरणानंतर 5 वर्षे रस्‍ते खोदाईस बंदी! नोडल प्राधिकरणाची स्‍थापना; अधिसूचना जारी

PWD no road digging rule: पीडब्‍ल्‍यूडी’कडून दरवर्षी राज्‍यातील अंतर्गत आणि मुख्‍य रस्‍त्‍यांचे हॉटमिक्‍स डांबरीकरण करण्‍यात येते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडून रस्‍त्‍यांच्‍या हॉटमिक्‍स डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्‍यानंतर अपवादात्‍मक स्‍थिती वगळता इतर कारणांसाठी कोणत्‍याही एजन्‍सीला पाच वर्षे संबंधित रस्‍ते खोदण्यास परवानगी न देण्‍याचा निर्णय ‘पीडब्‍ल्‍यूडी’ने घेतला असून, यासंदर्भात निर्णय घेण्‍यासाठी प्रधान मुख्‍य अभियंत्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नोडल प्राधिकरणाचीही स्‍थापना केली आहे.

पीडब्‍ल्‍यूडी’कडून दरवर्षी राज्‍यातील अंतर्गत आणि मुख्‍य रस्‍त्‍यांचे हॉटमिक्‍स डांबरीकरण करण्‍यात येते. परंतु, त्‍यानंतर काही खाती अंतर्गत वाहिन्‍यांसाठी पुन्‍हा रस्‍ते खोदण्‍यास सुरुवात करतात. त्‍यांची कामे पावसाळ्यातही सुरू असतात. त्‍याचा मोठा फटका नागरिक आणि वाहनचालकांना बसतो. त्‍यामुळेच आता ‘पीडब्‍ल्‍यूडी’ने रस्‍त्‍यांचे हॉटमिक्‍स डांबरीकरण झाल्‍यानंतर असे रस्‍ते अपवादात्‍मक स्‍थिती वगळता पाच वर्षे कोणतेही खाते किंवा एजन्‍सीला खोदता येणार नाहीत, अशी अधिसूचना जारी केली आहे.

त्‍यासाठी प्रधान मुख्‍य अभियंत्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ११ जणांचा समावेश असलेल्‍या नोडल प्राधिकरणाची स्‍थापना केली आहे. हॉटमिक्‍स डांबरीकरण केलेल्‍या रस्‍त्‍यांची खुदाई अपवादात्‍मक स्‍थितीत करण्‍यास परवानगी देण्‍याचा तसेच अशा सर्व कामांचे नियोजन आणि वेळापत्रक निश्चित करण्‍याचा अधिकार या प्राधिकरणाला असेल.

‘पीडब्‍ल्‍यूडी’ रस्त्‍यांची सुधारणा, रुंदीकरण तसेच हॉटमिक्स डांबरीकरणासंदर्भातील वार्षिक आराखडा तयार करून तो दरवर्षी ३१ मे रोजी किंवा त्यापूर्वी ‘जीआयएस’ प्लॅटफॉर्मवर अपलोड केला करेल. ज्‍या एजन्‍सींना अंतर्गत वाहिन्‍या टाकायच्‍या असतील, त्‍यांनाही असा आराखडा आणि त्‍यासंबंधीचे प्रस्‍ताव दरवर्षी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी ‘जीआयएस’ प्लॅटफॉर्मवर अपलोड करावे लागतील. त्‍यानंतर नोडल प्राधिकरण बैठका घेऊन अशा कामांच्‍या प्रस्‍तावांना मान्‍यता देईल, असे अधिसूचनेत म्‍हटले आहे.

नोडल प्राधिकरण असे

अध्‍यक्ष : प्रधान मुख्‍य अभियंता (पीडब्‍ल्‍यूडी) सदस्‍य : मुख्‍य अभियंता (पीडब्‍ल्‍यूडी)  सदस्‍य : मुख्‍य अभियंता (पीडब्‍ल्‍यूडी, रस्‍ते विभाग) सदस्‍य : मुख्‍य अभियंता (पिण्‍याचे पाणी खाते)  सदस्‍य : मुख्‍य अभियंता (जलस्रोत) सदस्‍य : मुख्‍य अभियंता (वीज)  सदस्‍य : व्‍यवस्‍थापकीय संचालक (मलनिस्सारण महामंडळ) सदस्‍य : संचालक (नागरी पुरवठा खाते)  सदस्‍य : संचालक (माहिती–तंत्रज्ञान खाते) सदस्‍य : सरव्‍यवस्‍थापक (भारत संचार निगम लिमिटेड) सदस्‍य : रवी भार्गव (बीएसएनएलच्‍या गोवा विभागाचे माजी सरव्‍यवस्‍थापक)  सदस्य  सचिव : ‘पीडब्‍ल्‍यूडी’च्‍या रस्ते विभागाचे अधीक्षक अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT