सरकारी कार्यालयांत शुकशुकाट, वास्कोत परिणाम; वर्षअखेर बहुतांश कर्मचारी रजेवर

Goa government employees year-end leave: गेल्या पाच दिवसांपासून बहुतेक सरकारी व निमसरकारी कार्यालयांतील कर्मचारी वर्षाची शिल्लक रजा संपविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Goa government employees year-end leave
Goa government employees year-end leaveDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गेल्या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांमध्ये रजेची मानसिकता दिसून येत असून, याला अधिकारी वर्गाचाही अपवाद नाही. वर्षाअखेरीस न वापरलेली नैमित्तिक रजा पुढील वर्षात हस्तांतरित करता येत नसल्याने, बहुतांश कर्मचारी डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत ती रजा संपवितात. त्यामुळे १९ डिसेंबरचा गोवा मुक्तिदिन ते ३१ डिसेंबर हा कालावधी प्रत्यक्षात ‘सुट्टीचा काळ’ ठरत असल्याचे चित्र आहे. याच कालावधीत शाळा व महाविद्यालयांना नाताळची सुट्टी असल्याने अनेक पालकही रजेवर जातात.

या पार्श्वभूमीवर वास्को येथील मामलेदार, उपजिल्हाधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी कार्यालयांत शुकशुकाट पसरलेला दिसून आला. कार्यालये उघडी असली तरी तेथे कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांना केवळ रिकाम्या खुर्च्या व टेबल्सच दिसून येत होते. काही कार्यालयांत निवेदने व अर्ज स्वीकारण्यासाठीही कोणी नसल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. दिवे सुरू असूनही प्रत्यक्ष कामकाज ठप्प असल्याने नागरिक काही वेळ थांबून अखेर परत फिरले.

Goa government employees year-end leave
Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

नगरपालिका, जिल्हा पंचायत यांसारख्या निमसरकारी कार्यालयांतही या काळात तुरळक उपस्थिती होती. अनेक वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याने फायली पुढे सरकल्या नाहीत. चौकशी केल्यास संबंधित अधिकारी रजेवर असल्याचेच उत्तर मिळत होते. वर्ष संपण्याच्या टप्प्यात शिल्लक रजा संपविणे अपरिहार्य असल्याचीच प्रतिक्रिया सर्वत्र ऐकायला मिळत होती.

Goa government employees year-end leave
Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

पोलिस खाते सक्रिय!

पोलिस व अग्निशामक दल यांसारखी अत्यावश्यक खाती याला अपवाद ठरली आहेत. पणजीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), जुना गोवा येथील शवप्रदर्शन, विविध फेस्त, जिल्हा पंचायत निवडणुका तसेच नाताळ व नववर्षोत्सव यामुळे या खात्यांतील कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आलेली नाही.

बंदोबस्तासाठी आयआरबी तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या राखीव बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी व वाढलेली वाहनसंख्या यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी गोवा मानवसंसाधन विकास महामंडळाचे सुरक्षा रक्षकही रस्त्यावर उतरविण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com