Purple Fest Dainik Gomantak
गोवा

Purple Fest 2024: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कृत्रिम अवयव युनिट, पाठिचा कणा पुनवर्सन केंद्राचे होणार उद्घाटन

गोव्यातील Purple Fest 2024 मध्ये जगभरातून येणार 8000 हून अधिक प्रतिनिधी

Akshay Nirmale

Goa Purple Fest 2024: गोव्यात येत्या 8 जानेवारीपासून पर्पल फेस्टिव्हलला सुरवात होत आहे. हा महोत्सव आता आंतरराष्ट्रीय असणार आहे. या पर्पल फेस्टसाठी देशभरातून आणि अमेरिका, कॅनडा, जपान, स्वीडन, स्वित्झर्लंड, इराण, उझबेकिस्तान येथून 8000 हून अधिक प्रतिनिधी येणार आहेत.

या फेस्टच्या निमित्ताने काही गोष्टींची सुरवातही गोव्यात होत आहे. बांबोळीतील गोमॅको रूग्णालयात पाठीचा कणा पुनर्वसन सेवा केंद्र आणि भारतीय कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळाच्या (Artificial Limbs Manufacturing Corporation of India - ALIMCO) युनिटचे उद्घाटन यावेळी होणार आहे.

तसेच 30 व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षांचे लोकार्पणही यावेळी होणार आहे.

पूर्वी पाठीच्या कण्याला दुखापत झालेले लोक चार महिने उपचारासाठी राज्याबाहेर जात. आता गोव्यातच उपचार करणे शक्य होईल. नवी दिल्लीतील इंडियन स्पायनल इंज्युरीज सेंटरचे सहकार्य या केंद्राला लाभणार आहे.

GMC येथे ALIMCO चे कायमस्वरूपी युनिट सुरू होणार आहे. यामुळे रुग्णांना त्यांचे कृत्रिम अवयव त्वरित मिळू शकतील. उत्सवाच्या सर्व दिवसांमध्ये सर्व अपंगांसाठी मूल्यांकन शिबिरांचा तसेच निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र व्यक्तींना मोफत मदत आणि उपकरणे वाटपाचा लाभ मिळू शकतो.

काही व्हीलचेअर-अॅक्सेसिबल-ई-रिक्षा पहिल्यांदा पणजीमध्ये गेल्या वर्षीच्या पर्पल फेस्टमध्ये लाँच करण्यात आल्या. बरेच लोक या पाच व्हीलचेअर-अॅक्सेसिबल-ई-रिक्षांचा वापर ऑफिसला जाण्यासाठी, हॉस्पिटलला भेट देण्यासाठी किंवा त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी करतात.

महोत्सवात समावेशक शिक्षण, डाऊन सिंड्रोम, हिमोफिलिया, कुष्ठरोग, अदृश्य अपंगत्व, अपंगत्वावरील वकिलांची परिषद, राष्ट्रकुल डॉक्टरांची परिषद, स्पाइनल रिहॅबवरील परिषद, अखिल भारतीय सांकेतिक भाषा दुभाषी परिषद, श्रवण अक्षमता या विषयांवर 30 परिषदा होणार आहेत.

लोकांना दिव्यांग व्यक्तींबद्दल संवेदनशील बनवणे, हे या फेस्टचे उद्दिष्ट आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य आयुक्त कार्यालय आणि समाजकल्याण विभागातर्फे या फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या वर्षीपासून अपंगांसाठी स्वतंत्र विभागही सुरू करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT