Purnananda Chiri and Melvin Rodrigues  Dainik Gomantak
गोवा

Sahitya Akademi : सर्वसाधारण मंडळावर पूर्णानंद च्यारी आणि मेल्विन रॉड्रिग्ज यांची निवड

साहित्य अकादमीच्या मंडळावर कोकणीच्या दोन प्रतिनिधींना स्थान असते

गोमन्तक डिजिटल टीम

Sahitya Akademi : केंद्रीय साहित्य अकादमीच्या नवीन सर्वसाधारण मंडळाचे आज गठण करण्यात आले असून या मंडळावर कोकणी भाषेचे प्रतिनिधी म्हणून गोव्याचे सुप्रसिद्ध गीतकार पूर्णानंद च्यारी आणि मंगळूरू येथील सुप्रसिध्द कवी मेल्वीन रॉड्रिग्ज यांची निवड करण्यात आली आहे.

साहित्य अकादमीच्या मंडळावर कोकणीच्या दोन प्रतिनिधींना स्थान असून राज्य सरकारच्या कोकणी अकादमीने च्यारी यांचे नाव सुचविले होते तर कोंकणी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून रोडिग्स यांची निवड करण्यात आली आहे. च्यारी हे कोकणी अध्यापनात असून एक कवी आणि गीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. रॉड्रिग्ज हे मंगळूरी कवी असून एक कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, ही निवड झाल्यावर च्यारी यांच्याशी संपर्क साधला असता केंद्रीय समितीवर कोकणी भाषेचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे हाच मोठा बहुमान असल्याचे सांगितले. पुढील योजनांबद्दल विचारले असता कोकणी भाषेचा निमंत्रक कोण होणार हे स्पष्ट झाल्यानंतरच योजना काय हे सांगणे उचित असे ते म्हणाले.

रॉड्रिग्ज यांच्याशी संपर्क साधला असता आता पर्यंत या समितीवर गोव्यातील प्रतीनिधींचीच निमंत्रक म्हणून निवड झाली आहे. साहित्य अकादमीवर भाषेसाठी अधिक योजना राबविण्याचे अधिकार निमंत्रकानाच अधिक असतात असे सांगून यदाकदाचित निमंत्रक म्हणून माझी निवड झाल्यास अजूनही जो कोकणी समाज आणि परिसर कोकणी साहित्यीक चळवळी पासून दूर आहे त्यांना या चळवळीच्या मुख्य धारेत आणण्याचा माझा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT