Women's Day Dainik Gomantak
गोवा

मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची

शरीरसौष्ठवपटू करिष्मा पारकरची कामगिरी महिलांसाठी मार्गदर्शक

दैनिक गोमन्तक

लक्ष्मीकांत गावणेकर

फातोर्डा: जगातील अनेक सुंदर महिलांबद्दल अनेकांना माहिती असेलच. पण काही महिला अशा असतात ज्यांची सौंदर्याची व्याख्या पूर्णपणे वेगळी असते. अशीच एक आहे करिष्मा पारकर. पेशाने डेंटिन्ट असलेल्या शरीरसौष्ठवपटू करिष्मा पारकर हिने अनेक अडचणींचा डोंगर सर करत यशाचा झेंडा रोवला आहे. तिने फडकवलेला ध्वज आज इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

2018 साली तिने आपल्या बॉडी बिल्डिंगच्या करिअरला सुरवात केली. एका वर्षाच्या आत 2019 मध्ये तिने शेरू क्लासिक बॉस क्लासिक शॉन रे क्लासिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. बिल्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी संजय पाटील यांनी करिष्माबद्दल सांगितले की, तिने अल्पवधीत घेतलेले यश कौतुकास पात्र आहे. एका फिझिकल फिटनेसमध्ये दिलेल्या टेस्टमुळे तिचे गुण हेरुन तिला मार्गदर्शन केले. पेशाने डेंटिस्ट असलेल्या करिष्माने आपली बॉडी बिल्डिंगमधील करीकरडी अजूनपर्यंत सुरू ठेवली आहे. यापुढे राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविण्याची ती तयारी करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

परिस्थितीला सामोरे जा

करिष्माने गोवा व पुण्यातील स्पर्धेत दोन रौप्य पदके आणि एक कास्य मिळवले. यामागे बॉडी बिल्डिंग असोसिएशन ऑफ गोवाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा लाभला. यात पदाधिकारी संजय रायकर यांची मोलाची भूमिका ठरली. महिलांनी कुठल्याही परिस्थितीला खचुन न जात समर्थपणे सामोरे जायला हवे असा संदेश तिने इतरांना दिला आहे.

अनेक अडचणींना पार करत ध्येयप्राप्ती

2018 मध्ये आपल्या पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर खचून न जाता करिष्माने मोठ्या जिद्दीने बॉडी बिल्डींच्या क्षेत्रात उडी घेतली. यावेळी तिच्या पालकांनी केवळ डॉक्टरी पेशाकडे लक्ष देण्याची सूचना केली. मात्र, तिने आपले ध्येय निश्‍चित केले होते. यावेळी आपले मनाचे ऐकून तिने अल्पावधीत यशाला खेचुन आणले. मुलींना बॉडीबिल्डिंगमध्ये सहभागी होण्यासाठी वेगळ्याच दृष्टीने पाहण्यात येत होते. तरीही तिने लोकांकडे दुर्लक्ष करून बॉडी बिल्डिंगमध्ये सहभागी होऊन यश गाठले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur Celebration: नरकासुर प्रदर्शनावेळी पणजीत वाढला दणदणाट! आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त; नागरिकांच्या तक्रारी

Ravi Naik: स्मृतींचा जागर, आठवांचा गहिवर! 'रवीं'ना आदरांजली; मुख्‍यमंत्री, मंत्री, आमदार, हितचिंतकांचे अभिवादन

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

Horoscope: घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव, वातावरण अत्यंत मंगलमय राहील; दिवाळीच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस?

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

SCROLL FOR NEXT