Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पठाणकोट अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले गोव्यात; निलंबित कॉन्स्टेबलसह दोघांना अटक

Goa Crime News: पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी गोवा डीजीपींचे या आंतरराज्य ऑपरेशनमध्ये सहकार्य केल्याबद्दल आभार मानले

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: पठाणकोट, पंजाब येथून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी ‘बीएसएफ’च्या एका निलंबित कॉन्स्टेबलसह दोघांना गोव्यातून अटक केली. गोव्यात काब द राम या भागात अपहरणकर्त्यांचे लोकेशन सापडल्यावर शनिवारी त्यांना तेथून अटक करण्यात आली. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी गोवा डीजीपींचे या आंतरराज्य ऑपरेशनमध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

गौरव यादव यांनी सांगितले की, ‘बीएसएफ’चा एक निलंबित हवालदार अमित राणा आणि एक जेसीबी ऑपरेटर रिषभ ऊर्फ ​सोनू या संशयितांना शनिवारी कुंकळ्ळी येथून अटक करण्यातआली. ३० ऑगस्ट रोजी शाळेतून परतत असताना पठाणकोट येथील शाह कॉलनीतील त्याच्या घराजवळून मुलाचे अपहरण करण्यात आले होते.

अपहरणकर्त्यांनी मुलाचे वडील पठाणकोटमधील प्रतिष्ठित व्यापारी बादल भंडारी यांच्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अपहरणानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षक दलजिंदर सिंग धिल्लन यांनी तातडीने एक पथक तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध घेतला. पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी शेजारच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नूरपूर येथून मुलाची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT