Railway Tender Fraud Dainik Gomantak
गोवा

Railway Tender Fraud: रेल्वे निविदेच्या आमिषाने साडेतीन लाखांना 'टोपी', पुण्यातील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

railway solar panel tender fraud goa: निविदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दिकरपाली येथील एका इसमाची साडेतीन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: रेल्वेच्या सौरऊर्जा पॅनेल उभारणी व देखभाल प्रकल्पाची निविदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दिकरपाली येथील एका इसमाची साडेतीन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी पिंपरी-पुणे येथील सूरज राजपूत याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिकरपाली येथील मैनुद्दीन महबूबसाहेब शेख यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयिताने रेल्वेचे सोलर पॅनेल बसविणे व देखभाल कामासंदर्भातील निविदेचे बनावट सबलेटिंग पत्र तयार करून ते अधिकृत असल्याचा भास निर्माण केला.

या निविदेचे काम मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने तक्रारदाराकडून वेळोवेळी पैसे उकळले. अखेरीस विविध व्यवहारांतून त्याने एकूण ३ लाख ५७ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

निविदेची कागदपत्रे बनावट असल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मैनुद्दीन शेख यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT